ट्रम्प यांच्या विरोधासाठी महिलांचे विवस्त्र आंदोलन!
By Admin | Published: July 18, 2016 09:32 PM2016-07-18T21:32:05+5:302016-07-18T22:08:35+5:30
ट्रम्प यांचा विरोध दर्शवण्यासाठी क्लेव्हलँड शहरातील महिला रस्त्यावर अवतरल्या, त्या पण विवस्त्र होऊन त्यामुळे स्थानिक माध्यमात हा चर्चेचा झाला होता.
>ऑनलाइन लोकमत
क्लेव्हलँड, दि. १८ : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेले आहेत. राज्याराज्यांमध्ये होत असलेल्या प्रायमरीज आता संपत आल्या आहेत. आत्तापर्यंत झालेल्या प्रायमरींमध्ये आश्चर्यकारकपणाने इतर सगळे स्पर्धक मागे पडून डोनाल्ड ट्रम्प यांना रिपब्लिकनची उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झाल्यासारखे आहे. वादग्रस्त विधानांमुळे ट्रम्प यांच्यावर सातत्याने टीका होत आलेली आहे. अशाचप्रकारे त्यांचा विरोध दर्शवण्यासाठी क्लेव्हलँड शहरातील महिला रस्त्यावर अवतरल्या, त्या पण विवस्त्र होऊन त्यामुळे स्थानिक माध्यमात हा चर्चेचा विषय तर झालाच पण हे वेगळ्या पद्धतीचे आंदोलन जगभर गाजत आहे.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्षपद भूषविण्यास डोनाल्ड ट्रम्प अपात्र आहेत, असे सांगण्यासाठी येथे शंभरपेक्षा जास्त महिलांनी विवस्त्र अवस्थेत आरसे समोर धरले होते. रिपब्लिकन राष्ट्रीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला १०० पेक्षा अधिक महिला एकत्र येऊन त्यांनी ट्रम्प यांच्या विरोधात आंदोलन छेडले होते. या अधिवेशनात ट्रम्प यांना पक्षाचा उमेदवार म्हणून जाहीर केले जाणार आहे. ट्रम्प यांची धोरणे व विचार हे समाजात फूट पाडणारे असल्याची देशात भावना आहे व त्यांच्या पक्षातही त्याबद्दल इशारे देण्यात आले असताना अत्यंत कठीण अशी प्राथमिक फेरी ट्रम्प जिंकले आहेत.