इलॉन मस्क यांच्यासोबत काम करण्याची सुवर्णसंधी; शिक्षणाची अट नाही, जाणून घ्या माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 14:59 IST2025-01-16T14:58:20+5:302025-01-16T14:59:03+5:30

इलॉन मस्क यांनी स्वतः पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

Work With Elon Musk: Golden opportunity to work with industrialist Elon Musk; No education requirement, see | इलॉन मस्क यांच्यासोबत काम करण्याची सुवर्णसंधी; शिक्षणाची अट नाही, जाणून घ्या माहिती...

इलॉन मस्क यांच्यासोबत काम करण्याची सुवर्णसंधी; शिक्षणाची अट नाही, जाणून घ्या माहिती...

Work With Elon Musk : कॉम्प्युटर कोडिंगचे ज्ञान असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. Tesla, SpaceX अन् X सारख्या कंपन्यांचे प्रमुख Elon Musk यांच्यासोबत काम करण्याची एक मोठी संधी चालून आली आहे. स्वतः इलॉन मस्क यांनीच याबाबत पोस्ट केली असून, कोडिंगचे ज्ञान असणारा कोणताही व्यक्ती या नोकरीसाठी अर्ज दाखल करू शकतो. विशेष म्हणजे, या नोकरीसाठी कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाची अट नाही. 

काय म्हणाले इलॉम मस्क? पाहा...
इलॉन मस्कने यापूर्वीही म्हटले होते की, एखाद्या व्यक्तीसाठी पदवीपेक्षा काम करण्याची क्षमता असणे अधिक महत्त्वाचे आहे. टेस्लामध्ये काम करण्यासाठी कोणत्याही पदवीची आवश्यकता नाही, असेही त्यांनी अनेकदा सांगितले आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, एखाद्या व्यक्तीची क्षमता, त्याच्या पदवीवरुन ठरत नाही, तर त्याच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असते. ते म्हणतात की, शाळांमध्ये मुलांना समस्या लक्षात ठेवण्याऐवजी ते कसे सोडवायची, हे शिकवले पाहिजे. 

इलॉन मस्क यांची पोस्ट


"तुम्ही हार्डकोर सॉफ्टवेअर इंजीनिअर असाल आणि ॲप तयार करण्याची इच्छा असेल, तर तुमचे सर्वोत्तम काम code@x.com वर पाठवून आमच्यात सामील व्हा. तुम्ही कोणत्या शाळेत गेलात किंवा तुम्ही शाळेत गेलात की नाही किंवा तुम्ही कोणत्या मोठ्या कंपनीत काम केले आहे, याची आम्हाला पर्वा नाही. फक्त तुमचा कोड दाखवा," अशी पोस्ट इलॉन मस्क यांनी केली आहे.

नेटकऱ्यांनी केले कौतुक
काही लोकांचा असा विश्वास आहे की, इलॉन मस्कची ही पद्धत योग्य आहे. कारण ज्यांना फार चांगले शिक्षण मिळाले नाही, अशा लोकांनाही यामुळे संधी मिळेल. पण अशा प्रकारे मोठ्या संख्येने लोकांना नोकऱ्या देणे कठीण जाईल, असेही काही लोकांचे मत आहे. 

एकाच ॲपमध्ये सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न
इलॉन मस्क यांना अनेक गोष्टींसाठी वापरता येणारे ॲप तयार करायचे आहे. या ॲपमध्ये पेमेंट करणे, संदेश पाठवणे, वस्तू खरेदी करणे आणि मल्टीमीडिया वापरणे, अशा अनेक सुविधा असतील. हे ॲप चीनच्या WeChat ॲपसारखे असेल, जिथे तुम्ही सोशल मीडिया वापरू शकता, वस्तू खरेदी करू शकता आणि पेमेंटदेखील करू शकता. यासाठीच ही नवीन भरती सुरू असण्याची शक्यता आहे.

Web Title: Work With Elon Musk: Golden opportunity to work with industrialist Elon Musk; No education requirement, see

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.