जागतिक बँकेची योजना जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 06:07 AM2020-03-05T06:07:18+5:302020-03-05T06:07:28+5:30
या योजनेचा उद्देशच संबंधित देशाने परिणामकारकपणे कृती करावी असा आहे, असे जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी वार्ताहरांना सांगितले.
वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसचा उद्रेक झालेले देश त्याला यशस्वीपणे तोंड देऊ शकतील यासाठी वेगाने निधी उपलब्ध होईल, अशी १२ अब्ज डॉलर्सची योजना जागतिक बँकेने मंगळवारी जाहीर केली.
या योजनेचा उद्देशच संबंधित देशाने परिणामकारकपणे कृती करावी असा आहे, असे जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी वार्ताहरांना सांगितले. मालपास म्हणाले, ‘कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी गरीब देशांकडे फार कमी साधने आहेत, त्यामुळे त्यांच्यावर या खर्चाचा अतिरिक्त बोजा टाकणे योग्य नाही.’ या योजनेतील काही निधी हा जगातील फारच गरीब देशांसाठी
आहे. त्याचा वापर वैद्यकीय उपकरणे किंवा आरोग्य सेवा घेण्यासाठी, तज्ज्ञांची सेवा आणि धोरणाबद्दल सल्ला घेण्यासाठी केला जाऊ शकेल, असे बँकेने निवेदनात म्हटले.
‘या योजनेतील ८ अब्ज डॉलरची रक्कम ज्या देशांनी मदतीची विनंती केली त्यांना दिली जाईल. बँक अनेक सदस्य देशांच्या संपर्कात आहे.’
मात्र कोणत्या देशाला प्रथम मदत मिळेल हे त्यांनी नाव घेऊन सांगितले नाही. मालपास यांनी मुद्दा वेगाने काम करण्याचा आहे. लोकांचे प्राण वाचविण्यासाठी वेग गरजेचा आहे, असे सांगितले.