जागतिक बँकेने पाकिस्तानला दिला इशारा! सुधारणा केली नाहीतर आणखी गरिबी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 02:38 PM2023-12-29T14:38:32+5:302023-12-29T14:39:34+5:30

पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून बिकट झाली आहे.

World Bank warned Pakistan Reformed or else poverty will increase | जागतिक बँकेने पाकिस्तानला दिला इशारा! सुधारणा केली नाहीतर आणखी गरिबी वाढणार

जागतिक बँकेने पाकिस्तानला दिला इशारा! सुधारणा केली नाहीतर आणखी गरिबी वाढणार

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानची आर्थिक परिस्थीती बिकट झाली आहे. पाकिस्तानमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता पाकिस्तानला जागतिक बँकेने इशारा दिला आहे.  जागतिक बँकेने स्पष्टपणे सांगितले की, पाकिस्तानचे आर्थिक मॉडेल अपयशी ठरले आहे. इथे गरिबांसाठी काहीच नाही. श्रीमंतांना अधिक श्रीमंत करण्यासाठी सर्व धोरणे आखली जातात. पाकिस्तानमध्ये गरिबी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पाकिस्तानला अशी धोरणे बदलण्याची गरज आहे ज्याचा देशाच्या विकासावर परिणाम झाला आहे आणि त्याचा फायदा काही लोकांनाच झाला आहे.

वंदे भारत अन् अमृत भारत ट्रेनमध्ये नेमका फरक काय? प्रवाशांसाठी का खास असेल? जाणून घ्या

जागतिक बँकेचे देश संचालक नाजी बेनहसिन यांनी सांगितले की, हवामान बदलामुळे पाकिस्तानवर वाईट परिणाम झाला आहे. पाकिस्तानने कृषी क्षेत्र आणि ऊर्जा क्षेत्रातील धोरणे सुधारली पाहिजेत यावर बेनहासीन यांनी भर दिला. शेती, अनुदान आणि इतर अनेक उणिवा दूर करण्याची गरज आहे. जेणेकरून देशातील छोट्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकेल. तसेच, अधिकाधिक लोकांना शेतीमध्ये येण्यासाठी प्रोत्साहित करता येईल. पाकिस्तानच्या खराब आर्थिक मॉडेलमुळे तो आपल्या सहकारी देशांच्या तुलनेत खूपच मागे पडला आहे.

ते पुढे म्हणाले की, सत्ता आणि प्रभाव असलेले लोक सध्याच्या संकटामुळे निर्माण झालेल्या संधीचा फायदा घेतील आणि आवश्यक ते करतील का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पाकिस्तानच्या उज्ज्वल, समृद्ध आणि शाश्वत भविष्यासाठी एकत्र येण्याची हीच वेळ आहे. पाकिस्तानमधील करसवलती तातडीने कमी कराव्यात, अशी सूचना त्यांनी केली. तसेच, श्रीमंत लोकांवर जास्तीत जास्त कर लादून महसूल मिळायला हवा. पाकिस्तानमधील व्यावसायिक वातावरण सुधारण्याची गरज आहे. लघु उद्योगांसाठी चांगले वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. जेणेकरून पाकिस्तानमध्ये रोजगाराच्या संधी वाढू शकतील, असंही यात म्हटले आहे.

Web Title: World Bank warned Pakistan Reformed or else poverty will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.