इसिसविरुद्ध जग एकवटले

By admin | Published: November 18, 2015 04:19 AM2015-11-18T04:19:58+5:302015-11-18T04:19:58+5:30

फ्रान्सच्या राजधानीत इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरिया (इसिस)ने केलेल्या भीषण नरसंहारामुळे या दहशतवादी संघटनेच्या विरोधात जगभरातील अनेक देश एकवटू लागले आहेत.

The world gathered against this | इसिसविरुद्ध जग एकवटले

इसिसविरुद्ध जग एकवटले

Next

नवी दिल्ली/पॅरिस : फ्रान्सच्या राजधानीत इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरिया (इसिस)ने केलेल्या भीषण नरसंहारामुळे या दहशतवादी संघटनेच्या विरोधात जगभरातील अनेक देश एकवटू लागले आहेत. फ्रान्सने इसिसच्या इराकमधील तळांवरही हवाई हल्ले सुरू केले आहेत. तर फ्रान्सची पाठराखण करणाऱ्या देशांना इसिसने पुन्हा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर भारतभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नवी दिल्लीतील परदेशी दूतावास व वकिलातींच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. भारत सतर्क असल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी दिली.

धाडसत्र सुरूच
सोमवारच्या रात्रीही फ्रेंच पोलिसांचे धाडसत्र सुरू होते. फ्रान्समध्ये १२८ ठिकाणी छापे घालण्यात आले.
हल्ल्याच्या धक्क्यातून सावरू लागलेले पॅरिस मंगळवारी पूर्ववत कामाला लागले. शोककळा असली तरी जनजीवन वेगाने पूर्ववत होऊ लागले आहे.

दोन आठवड्यांपूर्वी इजिप्तमध्ये कोसळलेले विमान दहशतवाद्यांनी (इसिस) स्फोटकांद्वारे पाडल्याची रशियाने प्रथमच कबुली दिली आहे.

जगभरातील मुस्लीम नेत्यांनी स्वत:ला हा गंभीर प्रश्न विचारायला हवा की, या हल्ल्याचा निषेध करण्यास आपल्या समुदायाचे नेते म्हणावे तितक्या हिरिरीने पुढे का आले नाहीत?
- बराक ओबामा

Web Title: The world gathered against this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.