असुरक्षित अन्नामुळे वाढला जागतिक धोका

By admin | Published: April 7, 2015 03:50 AM2015-04-07T03:50:35+5:302015-04-07T03:50:35+5:30

कीटकजन्य अन्नपदार्थ खाल्ल्याने वर्षभरात तब्बल अर्धा अब्ज लोक आजारी पडले होते. याची ‘वैश्विक धोका’ अशा शब्दांत संभावना करीत जागतिक

World threatened by unprotected food | असुरक्षित अन्नामुळे वाढला जागतिक धोका

असुरक्षित अन्नामुळे वाढला जागतिक धोका

Next

वॉशिंग्टन : कीटकजन्य अन्नपदार्थ खाल्ल्याने वर्षभरात तब्बल अर्धा अब्ज लोक आजारी पडले होते. याची ‘वैश्विक धोका’ अशा शब्दांत संभावना करीत जागतिक आरोग्य संघटनेने कीटकजन्य अन्नपदार्थांच्या सेवनाने २०१० मध्ये सुमारे तीन लाख ५१ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचे म्हटले आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटना आज ७ एप्रिलपासून शेतापासून ताटापर्यंत हे आरोग्य जागृतीपर अभियान राबविणार आहे. आज जागतिक आरोग्य दिन आहे.
असुरक्षित अन्नपदार्थ, उदाहरणार्थ न शिजलेले जेवण सेवन करणे म्हणजे २०० आजारांना आमंत्रणच आहे. जुलाबापासून कर्करोगासारख्या आजारांचा धोका आहे. आधुनिक पद्धतीने अन्न उत्पादनामुळेही प्राणघातक किटाणूंचे प्रमाण वाढण्याचा धोका असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
असुरक्षित अन्नपदार्थांत प्राणघातक जिवाणू, विषाणू, परोपजीवी किंवा रसायने असतात. न शिजवलेले अन्नपदार्थ, पालेभाज्या आणि फळे यात विष्ठा आणि जलचर प्राणी यात सागरी जैव विष असते. आगामी काळात असे अन्नपदार्थ असलेले एखादे प्लेटही धोक्याचे आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. यासंदर्भात आपल्या पहिल्या अहवालात संघटनेने ‘स्थानिक अन्न समस्या ही आता तात्काळ जागतिक आणीबाणीमध्ये रूपांतरित’ होत असल्याच्या धोक्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉक्टर मार्गारेट चांग यांनी म्हटले की, ‘अन्न उत्पादनाचे औद्योगिकीकरण होत असून त्यांचा व्यापार आणि वितरणही वैश्विक झाले आहे. या बदलांमुळे अनेक प्रकारचे जिवाणू, विषाणू, परजीवी आणि रसायने यांचे जागतिक पातळीवर वहन होणे सोयीचे झाले आहे.’ (वृत्तसंस्था)

Web Title: World threatened by unprotected food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.