जग दुसऱ्या मोठ्या महामारीच्या उंबरठ्यावर; सिंहाच्या हाडांपासून औषध, मद्याची निर्मिती घातक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 10:27 AM2020-06-15T10:27:32+5:302020-06-15T10:29:49+5:30
CoronaVirus कोरोनाचा कहर कमी की काय़ म्हणून आता वैज्ञानिकांनी जगाला आणखी एका मोठ्या महामारीच्या धोक्याचा इशारा दिला आहे.
बिजिंग : चीनच्या वुहान शहरामध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक झाला आणि अख्खे जग यामध्ये वेढले गेले. आता पर्यंत 4,35,177 एवढ्या लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरातील देशांची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. करोडो लोक बेरोजगार झाले आहेत. कोरोनाचा कहर कमी की काय़ म्हणून आता वैज्ञानिकांनी जगाला आणखी एका मोठ्या महामारीच्या धोक्याचा इशारा दिला आहे.
यामागेही चीनचाच हात असणार आहे. चीनमध्ये सिंहांची अवैध शिकार केली जात आहे. त्यांच्या हाडांपासून औषधे, दारू आणि ज्वेलरी बनविण्यात येत आहे. यामुळे जगभरात आणखी एक मोठी महामारीचा फैलाव होण्याची भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार दक्षिण ऑफ्रिकेमध्ये हैरान करणारा अहवाल समोर आला आहे. यामध्ये 333 फार्ममध्ये हजारो सिंहांना जन्माला घातले जात आहे. या सिंहांना चोहुबाजुंनी बंद केलेल्या भागात शिकाऱ्यांकडून मारले जाते. त्यांची हाडे विकली जातात. सिंहांच्या हाडांना करोडो रुपयांची किंमत मिळते. यामुळे हा धंदा मोठ्या प्रमाणात फोफावत आहे.
चीन आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये पारंपरिक औषधे बनविण्यासाठी सिंहांच्या हाडांची मागणी कमालीची वाढू लागली आहे. सिंहाच्या हाडांपासून चीनी दारू आणि दागिणेही बनविले जात आहेत. एवढेच नाही तर या सिंहांना अशा परिस्थितीत ठेवले जाते ज्यामुळे मनुष्याला टीबी आणि बोटूलिझमसारखे प्राणघातक रोग महामारीचे रुप घेऊ शकतात.
यामध्ये रशियाचाही हात आहे. रशियातील श्रीमंत व्यक्ती शिकारी कुत्र्यांच्या मदतीने या सिंहांची शिकार करतात. हे सिंह बंदिस्त झाडी झुडुपांच्या परिसरात वाढविले जातात. तर काही सिंहांची हाडे काढली जातात आणि त्यांना जिवंत ठेवले जाते. धक्कादायक म्हणजे जोहान्सबर्गमध्ये सिंहांचे डोके आणि चामडे खुलेआम विकले जाते. अंदाजे 12000 सिंह या तस्करांच्या ताब्यात आहेत. तर जंगलामध्ये केवळ 3 हजार सिंह आहेत. श्रीमंत लोक शिकाऱ्यांना एका सिंहाच्या बदल्यात करोडो रुपये देतात.
जगभरात कहर
कोरोना व्हायरसने जगभरात कहर मांडला आहे. मृतांचा आकडा साडेचार लाखांच्या आसपास गेला आहे. एकट्या अमेरिकेमध्ये चार कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या....
CoronaVirus जून-जुलै नाही, नोव्हेंबर धोक्याचा! कोरोना उत्पात माजवणार; ICMR चा अंदाज
धक्कादायक! कोरोना पसरण्याच्या भितीने IRS शिवराज सिंहांची आत्महत्या
वाह प्रेमजी! दिलेल्या शब्दाला जागले; आयटी कंपनीला कोरोना हॉस्पिटल बनवले
अधुरी प्रेम कहानी! GF ला भेटण्यासाठी मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला डॉक्टर; जिवाला मुकला
दक्षिण कोरियात खळबळ! लष्करी कारवाई करा; किम जोंग उनच्या बहिणीचे सैन्याला 'आदेश'