जगातील 10 बदनाम सुसाईड पॉईंट्स

By admin | Published: April 26, 2016 03:39 PM2016-04-26T15:39:39+5:302016-04-26T16:23:30+5:30

ज्याप्रमाणे पर्यटनासाठी अनेक जागा प्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणे जगातील अनेक ठिकाणं आत्महत्या करण्यासाठी बदनाम आहेत

The World's 10 Bad Suicide Points | जगातील 10 बदनाम सुसाईड पॉईंट्स

जगातील 10 बदनाम सुसाईड पॉईंट्स

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 26 - ज्याप्रमाणे पर्यटनासाठी अनेक जागा प्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणे जगातील अनेक ठिकाणं आत्महत्या करण्यासाठी बदनाम आहेत. आपल्या देशातील एखादं ठिकाण पर्यटनासाठी प्रसिद्ध व्हावं म्हणून प्रत्येक देश प्रयत्न करत असतो. पण अनेक असे देश आहेत जिथलं ठिकाण आत्महत्या करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अनेक पर्यटक तसंच स्थानिक फक्त आत्महत्या करण्यासाठी या पॉईंट्सवर येतात. या सुसाईड पॉईंट्सवरुन आत्महत्या केली तर वाचण्याची शक्यता फार कमी आहे. अशा काही सुसाईट पॉईंट्सची माहिती जाणून घेऊया. 
 
 
 
1) गोल्डन गेट ब्रिज, सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका 
अमेरिकेतील गोल्डन गेट ब्रिज सुंदर ब्रिजपैकी एक आहे. मात्र हा ब्रिजदेखील सुसाईट पॉईंट म्हणून प्रसिद्द आहे. एकदा तर सॅन फ्रान्सिस्कोच्या अधिका-यांनी आत्महत्या करणा-यांचा रेकॉर्ड ठेवणच बंद केलं होतं. कारण आत्महत्येचा आकडा समोर येत असल्याने लोकांना आत्महत्या करण्याचं प्रोत्साहन मिळत असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. या ब्रिजची उंची 245 फूट आहे. आतापर्यंत 1600 लोकांनी या ब्रिजवरुन आत्महत्या केली आहे. 
 
2) ओकिगहरा फॉरेस्ट, माऊंट फुजी, जपान 
ओकिगहरा फॉरेस्ट 2013 साली 105 लोकांचे मृतदेह सापडले होते. 2010मध्ये 200 लोकांनी याठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न केला. ज्यामधील 54 लोक आत्महत्या करण्यात यशस्वी झाले. हे जंगल इतक मोठं आणि घन आहे की अधिका-यांना पोहचायला  वेळ लागतो. जेव्हा कधी या जागेची तपासणी केली जाईल तर अजून मृतदेह सापडतील असं म्हणलं जातं.
 
3) नायग्रा फॉल्स, अमेरिका / कॅनडा 
कॅनडा आणि अमेरिकेच्या सीमारेषेवर असलेला नायग्रा फॉल्स 165 फूट खोल आहे. अनेक लोकांचा मृत्यू दुर्घटनेमुळेदेखील झाला आहे. 1856 ते 1995 पर्यंत याठिकाणी 2780 आत्महत्या झाल्या आहे. प्रत्येक वर्षी कमीत कमी 25 लोक येथे आत्महत्या करतात.
 
4) लंडन अंडरग्राऊंड 
लंडनमध्ये असलेली अंडरग्राऊंड रेल्वे लाईन आत्महत्येसाठी बदनाम आहे. प्रत्येक वर्षी कमीत कमी 100 लोक या रेल्वे लाईनवर आत्महत्या करतात. ही रेल्वे लाईन 400 किमी लांब आहे. अनेक ठिकाणी लोकांना प्रवेश करण्यास बंदी आहे मात्र असे काही स्थानक आहेत जिथे आत्महत्या करणं सहज शक्य आहे. 
 
5) द गॅप, सिडनी, ऑस्ट्रेलिया 
100 फूट उंच या जागेवरुन अनेक लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात. दरवर्षी किमान 50 लोक येथे आत्महत्या करतात. ऑस्ट्रेलियाच्या एका प्रसिद्ध टीव्ही चॅनेलच्या न्यूज अँकरनेदेखील याठिकाणी आत्महत्या केली आहे.
 
6) नानजिंग यांगजे रिव्हर ब्रिज, चीन
  
चीनमधील नानजिंग यांगजे रिव्हर ब्रिजलादेखील सुसाईड पॉईंटमध्ये सामील करण्यात आलं आहे. या ब्रिजवर कार आणि ट्रेनसाठी वाहतूकीची व्यवस्था करण्यात आली आहे. 1968 साली हा ब्रिज बांधण्यात आला. 47 वर्षात किमान 2000 लोकांनी या ब्रिजवरुन आत्महत्या केली आहे. हा ब्रिज नदीपासून 200 फूट उंच अंतरावर आहे. सरकारने जारी केलेल्या अहवालानुसार दरवर्षी किमान 100 ते 200 लोकांना आत्महत्या करण्यापासून रोखण्यात येतं.
 
7) बीची हेड, इंग्लंड 
बीची हेडची उंची 500 फूट आहे. दरवर्षी किमान 20 लोक याठिकाणी आत्महत्या करतात. अनेक जणांनी याठिकाणी उडी मारुन आत्महत्या केली आहे. तर अनेकांनी कारमधून आत्महत्या केली आहे.
 
8) न्यूयॉर्क स्कायलाईन 
अमेरिकेतील दुस-या शहरांची तुलना करता न्यूयॉर्कमधील उंच इमारतींवरुन आत्महत्या करणा-यांची संख्या 10 पट जास्त आहे. गेल्या काही वर्षात 5 हजार लोकांनी इमारतींवरुन उडी मारुन आत्महत्या केल्या आहेत. काही घरांची उंचीदेखील 1000 फूटाहून जास्त आहे.
 
9) बोस्फोरस ब्रिज, इस्तांबूल, टर्की 
बोस्फोरस ब्रिज आशिया आणि युरोपाला जोडण्याचं काम करतो. या 210 फूट उंच ब्रिजवरुन उडी मारल्यास वाचण्याची शक्यता फक्त 3 टक्के आहे. 1973मध्ये हा ब्रिज बांधण्यात आला. आत्महत्या रोखण्यासाठी अधिका-यांनी या ब्रिजवरुन चालत जाण्यास मनाई केली होती. मात्र अनेकवेळा लोक टॅक्सीमधून याठिकाणी यायचे आणि मधेच उतरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करायचे.
 
10) माउंट मिहारा, जपान 
माउंट मिहारा जपानमधील सर्वात जास्त बदनाम सुसाईड पॉईंट आहे. माउंट मिहारा येथे ज्वालामुखी आहे. या ज्वालामुखीत उडी मारुन लोक आत्महत्या करतात. 1993 मध्ये 944 लोकांनी ज्वालामुखीत उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर माउंट मिहारामध्ये 350पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केली आहे. येथे फिरण्यासाठी येणारे अनेक लोक या धगधगत्या ज्वालामुखीमध्ये उडी मारुन आत्महत्या करतात. त्यामुळे याठिकाणी जाणा-या पर्यटकांना वन-वे तिकीट देण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
 

Web Title: The World's 10 Bad Suicide Points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.