Afghanistan crisis: जगभरातील मोबाईल, इलेक्ट्रीक कार स्वस्त करू शकते अफगाणिस्तान, कसे?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 05:33 PM2021-08-19T17:33:49+5:302021-08-19T17:34:15+5:30
Afghanistan lithium storage: 2010 मध्ये अमेरिकेच्या सैन्य अधिकाऱ्यांनी तिथे 1 लाख कोटी डॉलरची खनिज संपत्ती असल्याचे म्हटले होते. यामुळे देशाच्या अर्थकारणात मोठे बदल होऊ शकतात.
दोन दशकांपासून तालिबानने (Taliban) पुन्हा एकदा अफगाणिस्तानात सत्ता हिसकावली आहे. या तालिबानी राजवटीला काही देशांचा पाठिंबा तर काहींचा विरोध आहे. कारण तिथे अगणित खनिज संपत्ती आहे. तालिबानमुळे तेथील संपत्ती संकटात सापडली आहे. अफगाणिस्तान (Afghanistan) जगातील सर्वात गरीब देशांमध्ये मोडते. 2010 मध्ये अमेरिकेच्या सैन्य अधिकाऱ्यांनी तिथे 1 लाख कोटी डॉलरची खनिज संपत्ती असल्याचे म्हटले होते. यामुळे देशाच्या अर्थकारणात मोठे बदल होऊ शकतात. (The Taliban are sitting on $1 trillion worth of minerals the world desperately needs)
Vida Samadzai: मिस अफगानी! बिकिनी घालून रँम्प वॉक, बिग बॉसमध्ये रोमान्स; देशात उडवलेली खळबळ
अनेक ठिकाणी लोह, तांबे आणि सोन्याचे भांडार आहेत. काही दुर्मिळ खनिजेही आहेत. तिथे लिथिअमचे सर्वात मोठे साठे देखील असू शकतात, असे मानले जाते. लिथिअम आयन रिचार्जेबल बॅटरी बनविण्यासाठी वापरतात. मोबाईल फोन, लॅपटॉप, इलेक्ट्रीक व्हेईकलमध्ये याचा मोठा वापर होतो. सोबतच क्लायमेट चेंज सारख्या समस्येवरील दुसऱ्या तंत्रज्ञानामध्ये लिथिअमचा वापर केला जातो.
Afghanistan: हिम्मत लागते! अफगानिस्तान अजून पडलेले नाही; एक प्रांत अजूनही लढतोय
मात्र, मुलभूत सुविधा नसल्याने आणि प्रचंड दुष्काळामुळे तिथे आजवर या बहुमुल्य खनिजांचे उत्खनन झाले नाही. तालिबानी राजवटीत देखील सध्या ही परिस्थीती नाही. यामुळे चीन, रशिया, पाकिस्तानसारख्या देशांचे लक्ष ही खनिजे हडप करण्यावर आहे. लिथिअम कोबाल्ट सारख्या धातुंची मागणी मोठी आहे. परंतू पुरवठा कमी असल्याने त्याची किंमत मोठी आहे. यामुळे जर ही खनिजे मिळाली तर ती स्वस्त होतील आणि पर्यायाने त्यावरील अवलंबून असलेली इलेक्ट्रीक वाहने, मोबाईल स्वस्त होतील.
सध्या जगभरातील 75 टक्के लिथिअम. कोबाल्ट आणि दुर्मिळ खनिजे ही चीन, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो आणि ऑस्ट्रेलियामध्ये सापडतात. तिथेच सर्वाधिक उत्पादन होते. लिथिअमचा सर्वाधिक साठा हा बोलिव्हियामध्ये आहे, मात्र अमेरिकेच्या अंदाजानुसार अफगानमध्ये त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त साठा आहे. सध्या अफगाणिस्तानमध्ये खनिजांच्या उत्पादनातून 1 अब्ज डॉलरची कमाई होते. यामध्ये 30 ते 40 टक्के रक्कम ही भ्रष्टाचारासाठी वापरली जाते. या प्रकल्पांवर तालिबानने कब्जा केला आहे.
Afghanistan Crisis: हे तालिबानी कमांडो की अमेरिकेचे? काबुलच्या रस्त्यांवर पाहून जग हैराण झाले