जगातलं पहिलं गर्भनिरोधक अॅप, वाचा कसं वापरायचं
By admin | Published: February 13, 2017 06:34 AM2017-02-13T06:34:40+5:302017-02-13T06:46:43+5:30
सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कंडोम किंवा अन्य गर्भनिरोधक गोळ्यांवर पर्याय
Next
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 13 - जगभरात सध्या गर्भनिरोधक अॅपबाबत चर्चा सुरू आहे. पहिल्यांदाच ब्रिटन सरकारने या अॅपला मान्यता दिली आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कंडोम किंवा अन्य गर्भनिरोधक गोळ्यांवर पर्याय म्हणून या अॅपकडे पाहिलं जात आहे.
हफिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, 'नॅचरल सायकल' नावाच्या या अॅपला ब्रिटन सरकारच्या 'मेडिसिन अॅन्ड हेल्थकेअर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी अॅजेन्सी'कडून परवानगी मिळाली आहे. हे अॅप पारंपारिक गर्भनिरोधकापेक्षाही 99 टक्के उत्तम कार्य करत असल्याचं सांगितलं जात आहे.
कसं वापरायचं हे अॅप -
याच्या वापरासाठी महिलेला रोज सकाळी आपल्या जीभेखालील तापमान नोंदवणं गरजेचं आहे. त्यानंतर तापमानाची नोंद या अॅपमध्ये करावी. त्यानुसार महिला गर्भवती राहण्याची किती शक्यता आहे हे अॅप सांगेल.
म्हणजे ज्या दिवशी अॅप हिरवा रंग दाखवेल त्यादिवशी सेक्स केल्यास महिलेची गर्भवती राहण्याची शक्यता फार कमी असते. पण जर अॅपने लाल रंग दाखवला तर महिलेची गर्भवती राहण्याची शक्यता दाट असते, आणि सुरक्षापुर्वक सेक्स करावा अशी सुचना त्या महिलेला मिळते.
सध्या 161 देशातील 1 लाख 50 हजार स्त्रिया या अॅपचा वापर करत असल्याची माहिती आहे. हे अॅप नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक डॉक्टर राउल शेरवित्ज आणि त्यांची पत्नी एलिना बेर्गलुंड यांनी डेव्हलप केलं आहे. 2013 मध्ये हिग्स बोसॉन पार्टिकलाचा शोध घेण्याबद्दल दोघांचा नोबेल पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.