जगातली सर्वात पहिली वेबसाईट अद्यापही सुरू

By admin | Published: June 5, 2016 03:41 PM2016-06-05T15:41:50+5:302016-06-06T12:47:41+5:30

जगातली सर्वात पहिली वेबसाइट अद्यापही सुरू असल्याची माहिती पब्लिक डोमेनमधून समोर आली आहे.

The world's first website is still going on | जगातली सर्वात पहिली वेबसाईट अद्यापही सुरू

जगातली सर्वात पहिली वेबसाईट अद्यापही सुरू

Next

 ऑनलाइन लोकमत

इंग्लंड, दि. 5- जगातली सर्वात पहिली वेबसाइट अद्यापही सुरू असल्याची माहिती पब्लिक डोमेनमधून समोर आली आहे. ही वेबसाइट ब्रिटिश कॉम्प्युटर वैज्ञानिक टिम बर्नर्स ली यांनी 6 ऑगस्ट 1991 साली बनवली होती. ते युरोपियन आण्विक संशोधन संघटनेचे संशोधक होते. संशोधनाअंती त्यांनी या वेबसाइटची निर्मिती केली. 
ली यांनी ही वेबसाइट वर्ल्ड वाइड वेबच्या प्रोजेक्टसाठी समर्पित केली होती. बर्नर लींच्या पुढच्या कॉम्प्युटरसाठी ही वेबसाइट डिझाइन करण्यात आली. ही वेबसाईट वेबच्या मूलभूत वैशिष्ट्यांचं महत्त्व अधोरेखित करते. यासोबतच वेबसाइटमधून कॉम्प्युटरच्या माध्यमातून कागदपत्रं कशी मिळवायची आणि सर्व्हरचं सेटअप कशा  पद्धतीनं करता येते, याबाबत माहिती दिली आहे. 
विशेष म्हणजे ही बेवसाइट अद्यापही सुरूच आहे. वेब ब्राऊझरच्या अॅड्रेसबारवर ही   line-mode.cern.ch  लिंक टाकल्यास आजही ही वेबसाइट पाहायला मिळते. ही वेबसाईट तुम्हाला वर्ल्ड वाइड वेबसंदर्भात माहिती पुरवते. इंटरनेटच्या महाजालात या वेबसाइटचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. या वेबसाइटमुळेच यूआरएलएसच्या साहाय्यानं तुम्हाला डॉक्युमेंट आणि पेजेसची माहिती मिळवता येत असल्याचं समजतं आहे.  

Web Title: The world's first website is still going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.