श्रीलंकेत सापडले जगातील सर्वात महागडे रत्न, किंमत वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 07:22 PM2021-12-13T19:22:29+5:302021-12-13T19:22:54+5:30

श्रीलंकेत एका घराच्या अंगणात खोदकाम करताना जगातील सर्वात मोठ्या आकाराचे निलम रत्नं मिळाल्याची माहिती समोर आली आहे. येथील रत्नपुरा हा परिसर निलम खड्यांच्या साठ्यांसाठीच ओळखला जातो.

World's heaviest sapphire found in Sri lanka | श्रीलंकेत सापडले जगातील सर्वात महागडे रत्न, किंमत वाचून बसेल धक्का

श्रीलंकेत सापडले जगातील सर्वात महागडे रत्न, किंमत वाचून बसेल धक्का

googlenewsNext

श्रीलंकेची राजधानी कोलंबो पासून ६५ किमी दूर असणाऱ्या रत्नपुरा गावात जागातील सर्वात मोठे रत्न सापडले आहे. हे रत्न निलम असून या निलम खड्याचे वजन ३१० किलो इतके आहे. रत्नांच्या बाजारात याला कोरन्डम ब्लू म्हणून ओळखले जाते.

समोर आलेल्या माहितीनुसार श्रीलंकेत एका घराच्या अंगणात खोदकाम करताना जगातील सर्वात मोठ्या आकाराचे निलम रत्नं मिळाल्याची माहिती समोर आली आहे. येथील रत्नपुरा हा परिसर निलम खड्यांच्या साठ्यांसाठीच ओळखला जातो. येथील हिरे व्यापारी गोमेज यांनी आपल्या घराच्या अंगणात काम काढले होते. तेव्हा कामगारांना खोदकाम सुरु असताना एक मोठा दगड मिळाला. हा दगड साधासुधा नसून ते जगातील सर्वाधिक आकाराचे निलम रत्न असल्याचा उलगडा नंतर झाला. या दगडाची किंमत साधारण ७०० कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे.

तज्ज्ञांची मत
तज्ज्ञांच्या मते कोरोना व्हायरस महामारी आणि लॉकडाऊनमुळे येथील रत्न उद्योगाला गेल्या वर्षभरापासून मोठा फटका बसला आहे. पण या रत्नाच्या शोधामुळे आंतरराष्ट्रीय खरेदीदारांचे लक्ष पुन्हा एकदा श्रीलंकेकडे वळेल. एवढा मोठा नीलम मी याआधी कधीही पाहिला नव्हता. तो ४०० दशलक्ष वर्षांपूर्वी बनवला गेला असावा अशीही शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली.

वजन ऐकून थक्क व्हाल
या निलम खड्याचे वजन ३१० किलो इतके आहे. रत्नांच्या बाजारात याला कोरन्डम ब्लू म्हणून ओळखले जाते. श्रीलंकेची राजधानी कोलंबो पासून ६५ किमी दूर असणाऱ्या रत्नपुरा गावात हे रत्न सापडले आहे. सर्व कडे याच रत्नाची चर्चा आहे.

Web Title: World's heaviest sapphire found in Sri lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.