जगातील सर्वात मोठ्या विमानाने घेतलं उड्डाण

By admin | Published: August 18, 2016 11:43 AM2016-08-18T11:43:26+5:302016-08-18T11:43:47+5:30

जगातील सर्वात मोठं विमान ‘फ्लाईंग बॉम्ब’ने उड्डाण घेतलं आहे. लंडनमधील कार्डिंग्टन एअरफील्डवरुन फ्लाइंग बॉम्बची यशस्वी चाचणी घेण्यात आली

The world's largest airplane flight | जगातील सर्वात मोठ्या विमानाने घेतलं उड्डाण

जगातील सर्वात मोठ्या विमानाने घेतलं उड्डाण

Next
>- ऑनलाइन लोकमत 
लंडन, दि. 18 - जगातील सर्वात मोठं विमान ‘फ्लाईंग बॉम्ब’ने उड्डाण घेतलं आहे. लंडनमधील कार्डिंग्टन एअरफील्डवरुन फ्लाइंग बॉम्बची यशस्वी चाचणी घेण्यात आली. चार दिवसांपूर्वी तांत्रिक बिघाडामुळे विमानाचं उड्डाण रद्द करण्यात आलं होतं. मात्र यावेळी विमानाचं यशस्वीपणे उड्डाण झालं आहे. हे विमान बनवण्यासाठी तब्बल 10 वर्षाचा कालावधी लागला आहे. विमानाच्या निर्मितीसाठी 25 दशलक्ष पाऊण्ड म्हणजेच जवळपास 2.5 अब्ज रुपये इतका खर्च आला आहे. 
 
ब्रिटनच्या हायब्रीड एअर व्हेईकल कंपनीने याचं डिझाईन बनवलं आहे. हेलिअम गॅसवर उडणारं हे विमान ताशी 148 किमी वेगाने उडतं. विशेष म्हणजे या विमानाला उतरवण्यासाठी रनवेची गरज नाही. या विमानाला पाण्यावरही उतरता येतं तसंच रिमोटनेही नियंत्रित करता येऊ शकतं. 
 
हे विमान तीन आठवड्यांपर्यंत आकाशात प्रवास करु शकतं.  विमानात क्रूसोबत 48 प्रवाशांना घेऊन जाण्याची क्षमता आहे. तसंच 10 हजार टन सामानही उचलू शकतं. कोणत्याही प्रवासी जेटपेक्षा याची लांबी 15 मीटर जास्त असते.
 

Web Title: The world's largest airplane flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.