चीनमध्येही कमळ खुलणार; जगातील सर्वात मोठे स्टेडिअम बांधणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 10:13 AM2020-04-21T10:13:49+5:302020-04-21T10:15:03+5:30
चीनचा रिअल इस्टेट ग्रुपच एव्हरग्रँड जगातील सर्वात मोठे फुटबॉलचे स्टेडिअम उभारणार आहे.
चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे विस्कटलेली घडी आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. जेथून कोरोना व्हायरस पसरला ते केंद्र वुहानमधील लॉकडाऊन उठविण्यात आला आहे. याचवेळी जगाला कोरोनाच्या लढ्यामध्ये गुंतवून आपली ताकद दाखविण्याची चीन एकही संधी सोडत नाहीय. युरोपनंतर भारतात कोसळलेल्या शेअरबाजारात गुंतवणूक करण्यात येत होती. मात्र, दोन्ही ठिकाणी बंधने आणण्यात आली आहेत. आता चीन जगातील सर्वात मोठे स्टेडिअम उभारण्याच्या तयारीत असून महत्वाचे म्हणजे हे स्टेडिअम कमळाच्या आकाराचे असणार आहे.
चीनचा रिअल इस्टेट ग्रुपच एव्हरग्रँड जगातील सर्वात मोठे फुटबॉलचे स्टेडिअम उभारणार आहे. यासाठी १.७ अब्ज डॉलर म्हणजेच १३ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. या स्टेडिअमची क्षमता १ लाख प्रेक्षकांची असणार आहे. सद्या बार्सिलोनाचा कँप नाऊ जगातील सर्वात मोठे स्टेडिअम आहे. यामध्ये ९९३५४ प्रेक्षक बसू शकतात.
ग्वांगझूमध्ये हे स्टेडिअम बांधण्यात येणार असून २०२२ पर्यंत तयार होणार आहे. गेल्या आठवड्यात याचे कामही सुरु जाले आहे. हे स्टेडिअम चीनची फुटबॉल क्लब ग्वांगझू एव्हरग्रँडचे घरचे मैदान असणार आहे. कंपनीचे अध्यक्ष शिया हुजैन यांनी सांगितले की, आमचे लक्ष्य सिडनीचे ओपेरा हाऊस आणि दुबईचा बुर्ज खलिफा याच्याशी तुलना करणे आहे. हे स्टेडिअम जगातील चीनची ओळख बनेल. २०२३ च्या आशियाई स्पर्धेची सुरुवात या स्टेडिअममधून केली जाईल.
Chinese side Guangzhou Evergrande have begun construction on their new 100,000-seat stadium, at an estimated cost of $1.7 billion 🤯🌸 pic.twitter.com/AWXLuZNtxy
— ESPN FC (@ESPNFC) April 18, 2020
ग्वांगझूला फुलांचे शहर म्हटले जाते. यामुळे या स्टेडिअमचा आकार कमळाच्या फुलासारखा ठेवण्यात आला आहे. याचे प्रारुप शांघायमधील अमेरिकी डिझायनर हसन सईद याने तयार केले आहे. बांधकाम ३ लाख स्क्वेअर मीटर असणार आहे. यामध्ये १६ व्हीव्हीआयपी रुम, १५२ खासगी रुम, फिफाच्या सद्स्यांसाठी आणि खेळाडुंसाठी वेगवेगळ्या खोल्या आणि प्रसारमाध्यमांसाठी वेगळी सोय करण्यात येणार आहे. ईएसपीएननुसार अशाप्रकारचे तीन स्टेडिअम बनविण्यात येणार आहेत. यांची क्षमता ८० हजार ते १ लाख असणार आहे.
चीनमध्ये यंदा फिफा वर्ल्डकप होणार होता. मात्र, कोरोनामुळे स्पर्धा १ वर्ष पुढे ढकलण्यात येणार आहे.