ग्लोबल वॉर्मिंगमुळे जहाज कंपन्यांना फायदा, अधिक काळ होणार वाहतूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 02:50 PM2018-09-03T14:50:05+5:302018-09-03T14:52:29+5:30

1 सप्टेंबर रोजी डेन्मार्कमधील मर्क्स कंपनीने कंटेनर भरलेले एक जहाज या मार्गावर पाठवून वाहतूक करता येईल का याची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. जर ही चाचणी यशस्वी झाली तर जहाजकंपन्यांना त्याचा फायदा होऊ शकेल.

World's Largest Shipping Company Heads Into Arctic As Global Warming Opens The Way | ग्लोबल वॉर्मिंगमुळे जहाज कंपन्यांना फायदा, अधिक काळ होणार वाहतूक

ग्लोबल वॉर्मिंगमुळे जहाज कंपन्यांना फायदा, अधिक काळ होणार वाहतूक

Next

कोपनहेगन- ग्लोबल वॉर्मिंगमुळे ध्रुवावरील बर्फ वितळून समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे संपूर्ण जग चिंतेत असले तरी जहाज कंपन्यांना मात्र यातून एक वेगळाच फायदा होण्याची शक्यता आहे. आर्क्टिकवरील नॉर्दर्न सी रूट या कंपन्यांना आता अधिक काळ वापरता येण्याची शक्यता आहे.

1 सप्टेंबर रोजी डेन्मार्कमधील मर्क्स कंपनीने कंटेनर भरलेले एक जहाज या मार्गावर पाठवून वाहतूक करता येईल का याची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. जर ही चाचणी यशस्वी झाली तर जहाजकंपन्यांना त्याचा फायदा होऊ शकेल.
गेल्या दशकभरात पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे. यामुळे आर्क्टिकजवळील मार्ग दीर्घकाळ खुले राहिले तर वेळेमध्ये बचत होईल असे वाहतूक कंपन्यांना वाटते.



मर्क्स कंपनीने वेंटा मर्क्स हे 3600 कंटेनर भरलेले जहाज या मार्गावर पाठवले आहे. मर्क्सच्या या प्रयत्नामुळे भविष्यात या मार्गाच्या विकासाच्या दृष्टीने टाकलेले पाऊल आहे असे मत आर्क्टिक इन्स्टीट्यूटचे माल्ट हम्पर्ट यांनी व्यक्त केले आहे.
जर या मार्गावरुन प्रवास करता आला तर वेळेबरोबर खर्चातही बचत होणार आहे. रशिया आणि नॉर्वेच्या सीमेवरील मर्मंस्क येथून अलास्काच्या खाडीपर्यंत येथून जलमार्ग जातो. त्यासाठी जहाजांना रशियाची परवानगी घ्यावी लागते. पण वेळेत बचत होत असली तरी बर्फ तोडण्यासाठी वेगळा खर्च कंपन्यांना करावा लागतो. बर्फ वितळल्यास या खर्चात घट होऊ शकेल.




ग्लोबल वॉर्मिंगमुळे 2013 पर्यंत आर्क्टीक मधून जाणाऱ्या मार्गावरुन 4 फूट जाड बर्फ तोडून जाणारी जहाजे प्रवास करु शकतील. तर 2045-2060 या कालावधीमध्ये याच वेगाने बर्फ वितळत गेल्यास सामान्य मालवाहू जहाजेही येथून प्रवास करु शकतील.



 

Web Title: World's Largest Shipping Company Heads Into Arctic As Global Warming Opens The Way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.