World Most Powerful Passports : 'या' देशाचा पासपोर्ट आहे सर्वात शक्तिशाली, जाणून घ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर कोणता देश?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 12:54 PM2023-01-11T12:54:21+5:302023-01-11T12:59:12+5:30

World Most Powerful Passports : नवीन रिपोर्टनुसार आशियातील तीन देशांतील तीन पासपोर्ट आपल्या पासपोर्ट धारकांना इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक जागतिक प्रवासासाठी स्वातंत्र्य देतात.

worlds most powerful passport for 2023 revealed japan has the worlds most powerful passport whos worst | World Most Powerful Passports : 'या' देशाचा पासपोर्ट आहे सर्वात शक्तिशाली, जाणून घ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर कोणता देश?

World Most Powerful Passports : 'या' देशाचा पासपोर्ट आहे सर्वात शक्तिशाली, जाणून घ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर कोणता देश?

Next

पासपोर्ट रँकिंग दरवर्षी जारी केले जाते. या रँकिंगच्या आधारे (Passport Ranking) कोणत्या देशाचा पासपोर्ट किती शक्तिशाली आहे, हे समजून येते. या वर्षातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट जपानचा आहे. 2023 साठी जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची (World most powerful passports) रँकिंग जाहीर झाली आहे.  लंडनस्थित ग्लोबल सिटिजनशिप अँड रेसिडेंस अॅडव्हायजरी फर्म हेनले अँड पार्टनर्स (Henley and Partners) द्वारे जारी केलेल्या नवीन रिपोर्टनुसार आशियातील तीन देशांतील तीन पासपोर्ट आपल्या पासपोर्ट धारकांना इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक जागतिक प्रवासासाठी स्वातंत्र्य देतात.

सीएनएनमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, जपानी नागरिक जगभरातील विक्रमी 193 गंतव्यस्थान/देशांमध्ये व्हिसा-मुक्त किंवा व्हिसा-ऑन-डिमांड अॅक्सेसची सुविधा घेऊ शकतात. जपानने जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत सिंगापूर आणि दक्षिण कोरियाला मागे टाकले आहे. कारण या देशांतील नागरिकांना 192 देशांमध्ये मोफत व्हिसा एंट्री मिळू शकते.

हेनले अँड पार्टनर्सच्या रिपोर्टनुसार, जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट जपानकडे आहे. जपानचा पासपोर्ट जगभरातील 193 देशांमध्ये व्हिसा-फ्री किंवा व्हिसा-ऑन-अरायव्हलची सुविधा देतो. आशियातील या तीन देशानंतर युरोपियन देशांची भरमार लीडरबोर्डच्या टॉप 10 चार्टमध्ये ठामपणे आहे. जर्मनी आणि स्पेन संयुक्त तिसर्‍या क्रमांकावर आहेत, ज्यांचे नागरिक कोणत्याही समस्येशिवाय 190 देशांमध्ये फिरू शकतात. 

चौथ्या क्रमांकावर फिनलंड, इटली, लक्झेंबर्ग आहेत ज्यांच्या नागरिकांना 189 देशांमध्ये व्हिसा-फ्री किंवा व्हिसा-ऑन-अरायव्हलची सुविधा आहे. यानंतर ऑस्ट्रिया, डेन्मार्क, नेदरलँड आणि स्वीडन हे चार देश पाचव्या तर फ्रान्स, आयर्लंड, पोर्तुगाल आणि युनायटेड किंग्डम सहाव्या क्रमांकावर आहेत. यानंतर बेल्जियम, नॉर्वे, स्वित्झर्लंड आणि चेक रिपब्लिकसह न्यूझीलंड आणि अमेरिका 7 व्या क्रमांकावर आहेत. तर अफगाणिस्तान शेवटच्या स्थानावर आहे. एकूण 27 देश अफगाणिस्तानमध्ये व्हिसा फ्री एन्ट्री देतात.

The best passports to hold in 2023
1. Japan (193 destinations)
2. Singapore, South Korea (192 destinations)
3. Germany, Spain (190 destinations)
4. Finland, Italy, Luxembourg (189 destinations)
5. Austria, Denmark, Netherlands, Sweden (188 destinations)
6. France, Ireland, Portugal, United Kingdom (187 destinations)
7. Belgium, New Zealand, Norway, Switzerland, United States, Czech Republic (186 destinations)
8. Australia, Canada, Greece, Malta (185 destinations)
9. Hungary, Poland (184 destinations)
10. Lithuania, Slovakia (183 destinations)

Web Title: worlds most powerful passport for 2023 revealed japan has the worlds most powerful passport whos worst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.