जगातील सर्वांत वृद्ध आजीचा आज वाढदिवस; केक कापल्यावर म्हटले 'आणखी हवा'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 09:07 PM2020-01-05T21:07:16+5:302020-01-05T21:08:18+5:30

केन यांचा जन्म 1903 मध्ये झाला होता. 1922 मध्ये त्यांनी हिदेओ तनाका यांच्यासोबत लग्न केले होते.

The world's oldest grandmother's birthday today; When the cake is cut, it says 'want more' | जगातील सर्वांत वृद्ध आजीचा आज वाढदिवस; केक कापल्यावर म्हटले 'आणखी हवा'

जगातील सर्वांत वृद्ध आजीचा आज वाढदिवस; केक कापल्यावर म्हटले 'आणखी हवा'

Next

टोकिओ : जगातील सर्वांत वयोवृद्ध म्हणून गिनिज बुकमध्ये नाव असलेल्या वयोवृद्ध आजींनी आज 117 वा वाढदिवस साजरा केला. केन तनाका यांनी रविवारी जपानच्या एका नर्सिंग होममध्ये केक कापून वाढदिवस साजरा केला. 


केन यांचा जन्म 1903 मध्ये झाला होता. 1922 मध्ये त्यांनी हिदेओ तनाका यांच्यासोबत लग्न केले होते. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस् नुसार या दांम्पत्याला चार मुले होती. तसेच त्यांनी एका मुलाला दत्तकही घेतले होते. 


तनाका आजींनी नर्सिंग होमच्या कर्मचारी आणि त्यांच्या मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी मोठा केक कापला. या केकचा तुकडा खाल्ल्यानंतर हसत त्यांनी म्हटले की, ''खूप स्वादिष्ट आहे, मला आणखी हवा.''

गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस् नुसार गेल्या वर्षीच तनाका यांना जगातील सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती असल्याचे जाहीर करण्यात आले होते. गेल्या वर्षी 9 मार्चला त्यांचे वय 116 वर्षे 66 दिवस होते. तनाका यांचे दीर्घ वय कमी वयात वृद्ध होणाऱ्या जनतेसाठी एक प्रतिक आहे. गेल्या वर्षी जपानमध्ये जन्म घेणाऱ्या मुलांची संख्या 5.9 टक्क्यांनी घटून नऊ लाखांखाली होती.

Web Title: The world's oldest grandmother's birthday today; When the cake is cut, it says 'want more'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Japanजपान