जगातील सर्वात प्राचीन शुक्राणू सापडला

By admin | Published: May 15, 2014 03:34 AM2014-05-15T03:34:38+5:302014-05-15T04:20:09+5:30

जगातील सर्वात प्राचीन शुक्राणू आॅस्ट्रेलियात सापडला असून, तो १७ दशलक्ष वर्षांपूर्वीचा असल्याचा दावा केला जात आहे.

The world's oldest sperm is found | जगातील सर्वात प्राचीन शुक्राणू सापडला

जगातील सर्वात प्राचीन शुक्राणू सापडला

Next

सिडने : जगातील सर्वात प्राचीन शुक्राणू आॅस्ट्रेलियात सापडला असून, तो १७ दशलक्ष वर्षांपूर्वीचा असल्याचा दावा केला जात आहे. हा शुक्राणू शिंपल्याच्या जातीच्या प्राण्याचा असून, तो शिंपल्यात जतन झाला आहे. आॅस्ट्रेलियातील रिव्हरस्ले फॉसिल साईटवर हा शिंपला सापडला आहे. आॅस्ट्रेलियातील अनेक इतिहासपूर्व प्राणी येथेच सापडले आहेत, त्यात मांसाहारी कांगारूंचाही समावेश आहे. न्यू साऊथ वेल्स विद्यापीठातील संशोधक माईक आर्चर गेल्या ३५ वर्षांपासून रिव्हरस्ले येथे संशोधन करत असून, त्यांनी हा महत्त्वाचा शोध असल्याचे म्हटले आहे. जीवशास्त्रातही हा सर्वात प्राचीन शुक्राणू ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. शिंपल्यातील नराच्या शरीरापेक्षाही लांब हा शुक्राणू असून, पूर्णपणे वेटोळे घातलेल्या स्थितीत आहे. आॅस्ट्रोकॉड या नावाने ओळखल्या जाणार्‍या गोड्या पाण्यात आढळणार्‍या प्राण्याचे हे शुक्राणू आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: The world's oldest sperm is found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.