जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेचं 116व्या वर्षी निधन
By admin | Published: May 13, 2016 09:18 PM2016-05-13T21:18:45+5:302016-05-13T21:18:45+5:30
जगातली सर्वात वयोवृद्ध महिला सुशन्ना मुशत्ता जोन्स यांचं 116व्या वर्षी निधन झालं
Next
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 13- जगातली सर्वात वयोवृद्ध महिला सुशन्ना मुशत्ता जोन्स यांचं 116व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदही झाली आहे. ब्रुकलीनमध्ये वयोवृद्धांना राहण्यासाठी केलेल्या वृद्धाश्रमातच 12 मेच्या रात्री जोन्स यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या 10 दिवसांपासून जोन्स आजारी होत्या, अशी माहिती वार्धक्य शास्त्राच्या रिसर्च ग्रुपचे रॉबर्ट यंग यांनी दिली.
अल्बामातल्या मेंटागोमेरीमधल्या छोट्याश्या खेडेगावात 1899 साली जोन्स यांचा जन्म झाला. 11 भावंडांमध्ये त्या एक होत्या. 1922साली त्यांनी पदवी संपादन केली. त्यानंतर त्या कुटुंबीयांना शेतीच्या कामात मदत करू लागल्या. काही वर्षांनंतर त्यांनी ते काम करणं सोडून दिलं आणि न्यूयॉर्कला निघून गेल्या. जोन्स यांना कोणतंही अपत्य नव्हतं. त्यांचं लग्नही काही काळापुरतंच मर्यादित राहिलं. त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही नेहमीच प्रेम आणि उदारता दिली. त्या नेहमीच शेती फुलवण्यासाठी स्वतःच्या काकीला शेतात मदत करत होत्या. शेतातलीच ताजी फळं आणि भाज्या त्या खात होत्या. त्यामुळेच त्यांची प्रकृती उत्तम होती.
जोन्स या अमेरिकेतल्या 1800 सालानंतरच्या सर्वात वयोवृद्ध महिला आहेत. त्यांचा वयाची नोंद सर्वाधिक जगणा-या लोकांमध्ये झाली आहे. इटलीतल्या एम्मा मोरॅनो याही 116 वर्षं जगल्या होत्या. मात्र जोन्सपेक्षा काही महिन्यांनी त्या तरुण होत्या. मात्र त्या अधिकृत जगातल्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती नाहीत.