जगातील सर्वात वृध्द महिलेचे ११७ व्या वर्षी निधन
By admin | Published: April 1, 2015 03:52 PM2015-04-01T15:52:55+5:302015-04-01T15:52:55+5:30
जगातील सर्वात वृध्द व्यक्ती असलेल्या महिलेचे बुधवारी ११७ व्या वर्षी जापानमध्ये निधन झाले. या महिलेने नुकताच आपला ११७ वाढदिवस साजरा केला होता.
ऑनलाइन लोकमत
ओसाका, दि. १ - जगातील सर्वात वृध्द व्यक्ती असलेल्या महिलेचे बुधवारी ११७ व्या वर्षी जापानमध्ये निधन झाले. या महिलेने नुकताच आपला ११७ वाढदिवस साजरा केला होता. मिसाका ओकावा असे या महिलेचे नाव असून या महिलेचा जन्म जापानमधील ओसाका या ठिकाणी ५ मार्च १८९८ साली झाला होता. जगातील सर्वात वृध्द व्यक्ती म्हणून त्या महिलेची २०१३ साली गीनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली होती. ओकावा यांचा १९१९ साली युकीओ यांच्याशी विवाह झाला होता तसेच त्यांना दोन मुली व एक मुलगा असून चार नातू व सहा पणतू आहे. ओकावा यांच्या पतीचे १९३१ साली निधन झाले. काही दिवसापूर्वीच तिचा ११७ वा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी मी तिला तिच्या आयुष्याचे गुपीत विचारले होते परंतू तिने ते सांगण्यास रस दाखवला नसल्याचे ओकावाची मुलगी किमोनो हिने सांगितले.