जगातील सर्वात शक्तीशाली बॉडीबिल्डरचा केवळ 36 व्या वर्षी हार्ट अ‍ॅटॅकनं मृत्यू; पत्नीनं सांगिलं, शेवटच्या क्षणी काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 02:26 AM2024-09-14T02:26:57+5:302024-09-14T02:28:38+5:30

येफिमचिक यांचे वजन 340 पाउंड, उंची 6 फूट, छाती 61 इंच तर बायसेप्स 25 इंचाचा होता. यावरून ते किती धिप्पाड असतील याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

World's Strongest Bodybuilder illia golem yefimchyk Dies of Heart Attack at Just 36; The wife said, what happened at the last moment  | जगातील सर्वात शक्तीशाली बॉडीबिल्डरचा केवळ 36 व्या वर्षी हार्ट अ‍ॅटॅकनं मृत्यू; पत्नीनं सांगिलं, शेवटच्या क्षणी काय घडलं? 

जगातील सर्वात शक्तीशाली बॉडीबिल्डरचा केवळ 36 व्या वर्षी हार्ट अ‍ॅटॅकनं मृत्यू; पत्नीनं सांगिलं, शेवटच्या क्षणी काय घडलं? 

जगातील शक्तिशाली आणि प्रसिद्ध बॉडीबिल्डर्सपैकी एक असलेल्या इलिया गोलेम येफिमचिक यांचे हार्ट अ‍ॅटॅकने (हृदयविकाराचा झटका) निधन झाले आहे. गेल्या 6 सप्टेंबरला त्यांची प्रकृती खालावली होती. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येफिमचिक कोमात होते. यानंतर 11 सप्टेंबरला त्यांचा मृत्यू झाला. येफिमचिक केवळ 36 वर्षांचे होते.

यासंदर्भात बोलताना येफिमचिक यांच्या पत्नीने सांगितले की, येफिमचिक यांना हार्ट अ‍ॅटॅक आल्यानंतर, लगेचच त्यांची छाती कंप्रेस करण्यात आली. मात्र हळू हळू त्यांच्या मेंदूने काम करणे बंद केले. येफिमचिक यांचे वजन 340 पाउंड, उंची 6 फूट, छाती 61 इंच तर बायसेप्स 25 इंचाचा होता. यावरून ते किती धिप्पाड असतील याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

बॉडीबिल्डर्सना का येतात एवढे हर्ट अ‍ॅटॅक? -
खरे तर, बॉडीबिल्डर्स त्यांचे शरीर पंप करण्यासाठी स्टिरॉइड्स घेतात. याचा त्यांच्या अवयवांवर वाइट परिणाम होतो. याशिवाय, अधिक व्यायामामुळेही शरीराला विश्रांतीही मिळत नाही, याचाही आरोग्यावर वाईट परिणाम होतो. याशिवाय खराब आहारामुळेही हार्ट अॅटॅक येऊ शकतो.

Web Title: World's Strongest Bodybuilder illia golem yefimchyk Dies of Heart Attack at Just 36; The wife said, what happened at the last moment 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.