स्ट्रॉबेरी खाताय? आधी हे पाहा, आळ्या निघणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 03:24 PM2020-05-21T15:24:00+5:302020-05-21T15:27:26+5:30

स्ट्रॉबेरीमध्ये असंख्य किडे असतात हे कळताच तिने याची माहिती सा-यांना मिळावी म्हणून व्हिडीओ शेअर केला.

worms crawling inside strawberries people shocked-SRJ | स्ट्रॉबेरी खाताय? आधी हे पाहा, आळ्या निघणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

स्ट्रॉबेरी खाताय? आधी हे पाहा, आळ्या निघणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Next

जर आपल्याला स्ट्रॉबेरी आवडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी सावधगीरी बाळगण्याचा इशारा देणारा ठरू शकतो. बाजारातून स्ट्रॉबेरी आणताच लगेचच खाऊ नये, ते कमीतकमी 30 मिनिटे मीठाच्या पाण्यात घालून ठेवणे आवश्यक आहे. नेहमीप्रमाणे एका महिलेने बाजारातून स्ट्रॉबेरी आणली. आणलेली स्ट्रॉबेरी ३० मिनिटांसाठी मिठाच्या पाण्यात ठेवली. काही वेळानंतर स्ट्रॉबेरीतून सगळे किडे बाहेर पडत होते. 

@babyadrianne

SO GROSS!!! ##washyourstrawberries

♬ original sound - babyadrianne

स्ट्रॉबेरीमध्ये किडे असल्याचा विचारही तिने केला नसेल. पण हे खरंय, स्ट्रॉबेरीमध्ये असंख्य किडे असतात हे कळताच तिने याची माहिती सर्वांना मिळावी म्हणून व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी स्ट्रॉबेरी खाणार नसल्याचे निर्धारच केल्याचे कमेंटद्वारे सांगितले आहे. आतापर्यंत या व्हिडीओला २.५ लाख लोकांना पाहिला आहे.

@callmekristatorres

WAIT FOR IT... Still trying to think happy thoughts today. ##fyp##foryou##strawberrieswithbugs##bugsinstrawberries##rednoseday##got2bhome

♬ original sound - callmekristatorres

बजफीडच्या पत्रकार क्रिस्टा टॉरेस यांनीही ही पद्धत वापरुन पाहिली आणि त्यांनी देखील स्टॉबेरीतून किडे बाहेर निघत असल्याचे पाहिले. सोशल मीडियावर देखील हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. हे किडे स्टॉबेरीच्या बियांमध्ये मिसळून जातात आणि त्यानंतर ते बाहेर रेंगत येतात. स्ट्रॉबेरीमध्ये खरेच किडे निघतात का हे पडताळण्यासाठी एका युजरनेदेखील माइक्रोस्कोपच्यामदतीने स्ट्रॉबेरीचे निरिक्षण केले. त्यालादेखील अशाच प्रकारचे किड स्ट्रॉबेरीत दिसले. हा व्हिडीओदेखील १५ लाख लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर हे सगळे व्हिडीओ पाहून अनेकांनी स्टॉबेरी माझे आवडीचे फळ आहे. पण, यात इतके किडे असल्याचे पाहून आता खाणेच बंद केल्याचे सांगितले.

@erinyalin

@callmekristatorres and nobody wanted to tell me this huh

♬ original sound - callmekristatorres

Web Title: worms crawling inside strawberries people shocked-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.