'कोणत्याही देशासाठी चीनसोबतचे संबंध खराब करणार नाही'; पाकिस्तानने अमेरिकेला दाखवला आरसा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 02:14 PM2024-07-26T14:14:39+5:302024-07-26T14:22:40+5:30
पाकिस्तानने काही दिवसापूर्वीच चीन सोबतच्या संबंधाबाबत एक विधान केले आहे. अमेरिकेसोबत चांगले संबंध ठेवण्यासाठी चीनसोबतचे संबंध बिघडवणार नाही, असं पाकिस्तानने स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानने काही दिवसापूर्वीच चीन सोबतच्या संबंधाबाबत एक विधान केले आहे. अमेरिकेसोबत चांगले संबंध ठेवण्यासाठी चीनसोबतचे संबंध बिघडवणार नाही, असं पाकिस्तानने स्पष्ट केले आहे. यावेळी पाकिस्तानने अमेरिकेचा पाठिंबाही महत्वाचा असल्याचे म्हटले आहे. अमेरिकन मुत्सद्दी डोनाल्ड लू यांनी नुकतेच गुंतवणुकीच्या बाबतीत अमेरिका हे पाकिस्तानचे भविष्य असल्याचे सांगितले होते. चीन हा भूतकाळ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
"मंत्री जी जेब में हाथ डालकर मत आया करो..."! भरसंसदेत लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला भडकले अन्...
पाकिस्तानमधील स्थानिक वृत्तपत्र 'द डॉन'च्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा म्हणाल्या, 'अमेरिकेसोबतचे संबंध आणि चीनसोबतचे संबंध दोन्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. आम्ही दुसऱ्या देशाशी असलेल्या संबंधांसाठी एका देशाशी असलेल्या संबंधांचा त्याग करण्यावर विश्वास ठेवत नाही.' पाकिस्तान चीनसोबतचे संबंध दृढ करत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेसोबतचे संबंधही त्यांनी महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानसाठी मागितलेल्या १०१ मिलियन डॉलर्सच्या मदतीवर बायडेन प्रशासनाने अमेरिकन काँग्रेसकडून उत्तर मागितले होते. लू यांना त्यांच्या टिप्पणीबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आला होता, यात ते म्हणाले, 'गुंतवणुकीच्या बाबतीत चीन हा भूतकाळ आहे आणि आम्ही भविष्य आहोत.
फ्रँकफर्टमधील पाकिस्तानी वाणिज्य दूतावासावरील हल्ल्यांबाबत बलोच म्हणाले की, पाकिस्तानने जर्मन सरकारकडे आपली चिंता व्यक्त केली आहे. तसेच सुरक्षेबाबत सातत्याने चर्चा सुरू आहे. आम्ही आमच्या मिशनचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलत राहू आणि आमच्या मिशन कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यांपासून पूर्णपणे सुरक्षित राहतील याची खात्री करण्यासाठी सरकारांसोबत काम करत राहू.'
पीटीआय नेत्यांच्या सुटकेसाठी देशभरात समर्थक आंदोलन करणार
पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ प्रमुख इम्रान खान यांचे समर्थक तेहरीक-ए-इन्साफ आणि पक्षाच्या नेत्यांच्या सुटकेसाठी देशभरात निदर्शने करण्याच्या तयारीत आहेत. पीटीआय व्यतिरिक्त, जमात-ए-इस्लामीने वीज आणि इतर वस्तूंच्या वाढत्या महागड्या किमतींबद्दल इस्लामाबादमध्ये आंदोलन करण्याची घोषणा केली. ७१ वर्षीय माजी पंतप्रधान इम्रान खान आणि इतर पीटीआय नेत्यांच्या सुटकेसाठी पीटीआय समर्थक आंदोलन करणार आहेत.