दहशतवाद्यास पत्र लिहा!

By admin | Published: May 29, 2017 01:07 AM2017-05-29T01:07:45+5:302017-05-29T01:07:45+5:30

निरपराधांचे बळी घेण्यामागे दहशतवाद्यांचा काय हेतू असतो हे समजण्यास मदत व्हावी म्हणून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकडून

Write a letter to terrorists! | दहशतवाद्यास पत्र लिहा!

दहशतवाद्यास पत्र लिहा!

Next

लंडन : निरपराधांचे बळी घेण्यामागे दहशतवाद्यांचा काय हेतू असतो हे समजण्यास मदत व्हावी म्हणून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकडून, त्यांच्या शालेय अभ्यासाचा एक भाग म्हणून, ‘दहशतवाद्यास पत्र’ लिहून घ्यावे, अशी सूचना ब्रिटनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका नव्या पुस्तकात शिक्षकांना करण्यात आली आहे.
‘टॉकिंग अबाऊट टेररिझम’ असे या पुस्तकाचे नाव असून, गेल्या आठवड्यात मँचेस्टरमध्ये दहशतवादी हल्ला होण्यापूर्वी ते प्रसिद्ध झाले आहे. ‘डेली एक्स्प्रेस’ वृत्तपत्राने ही बातमी देताना म्हटले की, दहशतवाद्यांकडून निरपराधांचे हकनाक घेतले जाणारे बळी हेही ‘एक प्रकारचे युद्ध’ असल्याचे प्रतिपादन या पुस्तकात करण्यात आले असून, आपल्याला सन्मानाने वागणूक मिळत नसल्याच्या भावनेतून दहशतवादी लोकांना ठार करीत असतात, अशी कारणमीमांसा त्यात देण्यात आली आहे.
७ ते ११ या वयोगटातील प्राथमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांकडून, शालेय अभ्यासक्रमाचा भाग म्हणून, दहशतवाद्यास उद्देशून पत्र लिहून घ्यावे व प्रत्यक्षात एखाद्या दहशतवाद्यास प्रश्न विचारण्याची संधी मिळालीच, तर त्यांना कोणते सहा प्रश्न विचाराल, हेही विद्यार्थ्यांना लिहिण्यास सांगावे, अशी आग्रही शिफारस या पुस्तकात शिक्षकांना करण्यात आली आहे.
‘ब्रिलियंट पब्लिकेशन्स’ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकास पीटर वॅनलेस यांची प्रस्तावना आहे. बालहक्क संरक्षणासाठी काम करणाऱ्या ‘नॅशनल सोसायटी फॉर प्रिव्हेंशन आॅफ क्रुएल्टी टु चिड्रेन’ या संस्थेचे ते सीईओ आहेत. (वृत्तसंस्था)


शिक्षणतज्ज्ञांकडून टीका

शिक्षणतज्ज्ञांनी एवढ्या लहान वयाच्या विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारचा अभ्यास करून घेणे धोकादायक असल्याचे नमूद करून त्यावर टीका केली आहे. यासंदर्भात ‘कॅम्पेन फआॅर रिअल एज्युकेशन’चे अध्यक्ष क्रिस मॅक्नव्हर्न म्हणाले की, जे दहशतवादी कोणताही विधिनिषेध न बाळगता कोणालाही ठार करायला कमी करीत नाहीत, त्यांच्याकडेही आदराने पाहून त्यांचे मन जाणून घेण्याची ही कल्पना वेडगळपणाची आहे.

काल्पनिक संवादाने दहशतवादाचे मानवीकरण करण्याची प्राथमिक इयत्तांचे शालेय वर्ग ही जागा नाही. दहशतवाद्यांचे हेतू जाणून घेण्याच्या बहाण्याने हे पुस्तक त्यांच्याविषयी कणव दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे.

Web Title: Write a letter to terrorists!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.