चुकीच्या कवितेच्या ओळींनी २.५ अब्ज डॉलर्स गमावले, चीनच्या तंत्रज्ञान उद्योगाला आली जाग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 06:06 AM2021-05-12T06:06:06+5:302021-05-12T06:10:32+5:30

वँग हे सामान्यत: स्पष्ट बोलणारे अभियंते असून, त्यांना उत्तम दर्जाच्या वाङ्‌मयात गोडी आहे.

Wrong poem lines lose अ 2.5 billion, wake up Chinese technology industry | चुकीच्या कवितेच्या ओळींनी २.५ अब्ज डॉलर्स गमावले, चीनच्या तंत्रज्ञान उद्योगाला आली जाग

चुकीच्या कवितेच्या ओळींनी २.५ अब्ज डॉलर्स गमावले, चीनच्या तंत्रज्ञान उद्योगाला आली जाग

Next


बीजिंग : समाजमाध्यमावर आलेल्या फक्त २८ चिनी अक्षरांनी वादाला तोंड फोडले आणि त्यामुळे देशाच्या तंत्रज्ञान उद्योगाला खडबडून जागे केले. त्यानंतर मैइतूनचे मुख्य कार्यकारी अधिकारी वँग झिंग यांना त्यांच्या संपत्तीतील २.५ अब्ज डॉलर्स गमवावे लागले. कारण, त्यांनी चीनच्या पहिल्या सम्राटाने बंडखोरी मोडून काढण्यासाठी चुकीच्या मार्गदर्शनावर केलेल्या प्रयत्नांबाबत एक हजार वर्षे जुन्या कवितेची काही कडवी टाकली होती.

वँग हे सामान्यत: स्पष्ट बोलणारे अभियंते असून, त्यांना उत्तम दर्जाच्या वाङ्‌मयात गोडी आहे. वँग यांनी नंतर त्यांची ती पोस्ट काढून घेतली आणि माझ्या स्वत:च्या उद्योगाच्या लघुदृष्टीबद्दल मला खरोखर खेद होत आहे याचा खुलासा केला. सरकारवर टीका करण्याचा छुपा हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एवढे केले तरी जे आर्थिक नुकसान व्हायचे ते झाले. मैईतूनचे फक्त दोन दिवसांत २६ अब्ज डॉलर्स बुडाले. वँग यांच्या पोस्टला जी वरवर पाहता टोकाची प्रतिक्रिया अनुभवावी लागली त्यावरून जॅक मा यांच्या इंटरनेट साम्राज्याचे दोन आधारस्तंभ अलिबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेड आणि अँट ग्रुप कंपनीवर चीनच्या सरकारने कारवाई सुरू केल्यावर अनेक महिने मार्केट्‌स कसे काठावर राहिले, याला अधोरेखित करते.

थोडक्यात सांगायचे तर वँग यांच्या काही शब्दखेळांनी काही गुंतवणूकदारांना जॅक मा यांनी सार्वजनिक ठिकाणी चुकीच्या वेळी केलेल्या भाष्यांची आठवण झाली. 

टीकेचा हेतू नव्हता
सरकारवर टीका करण्याचा छुपा हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एवढे केले तरी जे आर्थिक नुकसान व्हायचे ते झाले. मैईतूनचे फक्त दोन दिवसांत २६ अब्ज डॉलर्स बुडाले. वँग यांच्या पोस्टला जी वरवर पाहता टोकाची प्रतिक्रिया अनुभवावी लागली. अनेक महिने मार्केट्‌स कसे काठावर राहिले, याला अधोरेखित करते
 

Web Title: Wrong poem lines lose अ 2.5 billion, wake up Chinese technology industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.