वुुहान हे जैविक चेर्नोबिल; स्टीव्ह बॅनॉन यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 07:21 AM2020-07-13T07:21:39+5:302020-07-13T07:22:16+5:30

चीनमधील काही विषाणूतज्ज्ञ पाश्चिमात्य देशांत स्थायिक झालेले असून कोरोनाचा संसर्ग पसरण्यात चीनच्या भूमिकेबद्दल पुरावे गोळा करण्यास ते अमेरिकेला मदत करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Wuhan O Biological Chernobyl; Alleged Steve Bannon | वुुहान हे जैविक चेर्नोबिल; स्टीव्ह बॅनॉन यांचा आरोप

वुुहान हे जैविक चेर्नोबिल; स्टीव्ह बॅनॉन यांचा आरोप

Next

वॉशिंग्टन : चीनमधील वुहान हे जैविक चेनोर्बिल आहे असा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सहकारी स्टीव्ह बॅनॉन यांनी केला आहे. चीनमधील काही विषाणूतज्ज्ञ पाश्चिमात्य देशांत स्थायिक झालेले असून कोरोनाचा संसर्ग पसरण्यात चीनच्या भूमिकेबद्दल पुरावे गोळा करण्यास ते अमेरिकेला मदत करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
हाँगकाँग स्कूल आॅफ पब्लिक हेल्थ या संस्थेत काम करणारी चिनी विषाणूतज्ज्ञ डॉ. ली मेंग यान या सध्या परागंदा झाल्या असून त्य अज्ञात स्थळी आहेत. कोरोना विषाणूविषयी चीन सरकारला पूर्वीपासून कल्पना होती व या विषाणूमुळे साथ पसरल्यानंतर चीन वस्तुस्थितीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप त्यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर बेनॉन यांनी चीनवर टीका केली आहे.
बॅनॉन हे ट्रम्प यांचे धोरणविषयक माजी मुख्य सल्लागार आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प विजयी होण्यासाठी बॅनॉन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी सांगितले की, कोरोनाची साथ पसरविण्यास चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने केलेल्या कृष्णकृत्यांचे पुरावेही काही चिनी विषाणूतज्ज्ञांनी अमेरिकेला दिले आहेत. वुहान इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजी या संस्थेसह त्या शहरातील इतर प्रयोगशाळांत काम करणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी अनेकांनी चीन व हाँगकाँगमधून फेब्रुवारीच्या मध्यापासून काढता पाय घेतला आहे. कोरोना साथ पसरविण्यासाठी चीनने बजाविलेल्या भूमिकेचे भरभक्कम पुरावे अमेरिकी गुप्तचर यंत्रणा गोळा करत आहे. प्रक्रियेला आणखी वेळ लागणार आहे.
बॅनॉन यांनी सांगितले की, चीन वुहानमधील प्रयोगशाळांमध्ये विषाणूंसंदभार्तील अनेक प्रयोग सुरू असतात. त्यातूनच अपघाताने किंवा प्रयोगशाळेतील मदतनीसाच्या चुकीने कोरोना विषाणू वातावरणात मिसळला.

युक्रेनमधील चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पातील अणुभट्टीत २६ एप्रिल १९८६ रोजी भीषण स्फोट होऊन त्यात १००हून अधिक लोक मरण पावले होते. या दुर्घटनेत शेकडो लोकांना किरणोत्साराची बाधा झाली होती. चीनमधील वुहान शहरातून कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाला व साºया जगभर पसरला. त्या पार्श्वभूमीवर स्टीव्ह बॅनॉन यांनी चीनमधील वुहान शहराला जैविक चेनोर्बिल म्हटले आहे.

Web Title: Wuhan O Biological Chernobyl; Alleged Steve Bannon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.