एक्स-रे स्कॅनरमधून महिला गेली आरपार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 01:28 AM2018-02-16T01:28:45+5:302018-02-16T01:29:02+5:30
सुरक्षा तपासणी करण्यापुरताही हॅण्डबॅगेचा विरह सहन न झालेल्या एका चिनी महिलेने हॅण्डबॅगेसह स्वत:ही एक्स-रे स्कॅनरमधून आरपार जाणे पसंत केले! दक्षिण चीनमधील डाँग्गुआन शहरातील रेल्वे स्थानकावर घडलेल्या या मुलखावेगळ््या घटनेचा चिनी इंटरनेटवर टाकलेला व्हिडीओ अत्यंत व्हायरल झाला आहे.
शांघाय : सुरक्षा तपासणी करण्यापुरताही हॅण्डबॅगेचा विरह सहन न झालेल्या एका चिनी महिलेने हॅण्डबॅगेसह स्वत:ही एक्स-रे स्कॅनरमधून आरपार जाणे पसंत केले! दक्षिण चीनमधील डाँग्गुआन शहरातील रेल्वे स्थानकावर घडलेल्या या मुलखावेगळ््या घटनेचा चिनी इंटरनेटवर टाकलेला व्हिडीओ अत्यंत व्हायरल झाला आहे. काही तासांत लाखो नेटिझन्सनी हा व्हिडीओ पाहिला व प्रतिक्रिया दिल्या. बहुतेक प्रतिक्रिया या महिलेला चक्रम ठरवणाºया होत्या. सामानाच्या सुरक्षा तपासणीसाठी वापरल्या जाणाºया स्कॅनरमधील क्ष-किरण खूपच शक्तिशाली असतात व ते माणसांना हानिकारक असतात. हॅण्डबॅगमधील थोड्या-बहुत रकमेसाठी हा धोका पत्करल्याबद्दल या महिलेची टिंगल केली गेली. या व्हिडीओमध्ये स्कॅनरपाशी असलेल्या रांगेत उभी असलेली ही महिली सुरक्षा रक्षकांशी सुरुवातीला हुज्जत घालताना दिसते. नंतर तिचा नंबर आल्यावर हॅण्डबॅग स्कॅनरमध्ये टाकण्याऐवजी बॅगसह तीच स्कॅनरच्या कन्व्हेअर बेल्टवर चढली आणि रांगत रांगत स्कॅनरच्या दुसºया बाजूने बाहेर पडली! तिच्या या वेडगळपणाने अचंबित झालेले अन्य प्रवासीही व्हिडीओत दिसतात. हॅण्डबॅग सुरक्षा तपासणीसाठी एक्स-रे स्कॅनरमध्ये टाकली तर तिच्यातील पैसे चोरीला जातील, या भीतीने पछाडल्यामुळे या महिलेने असे विचित्र वर्तन केल्याचे ‘यांगचेंग इव्हिनिंग न्यूज’ या वृत्तपत्राने लिहिले. जेथे खूप गर्दी असते अशा रेल्वे स्थानके व बस स्टँडवरही चीनमध्ये असे स्कॅनर अनेक ठिकाणी बसविलेले आहेत.