मैत्रीच्या आडून चिनी राष्ट्रपतींची बेईमानी, ...म्हणून लडाखमध्ये ड्रॅगन सैन्याने केली होती घुसखोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 01:45 PM2020-07-13T13:45:47+5:302020-07-13T13:52:49+5:30

पेइचिंग/नवी द‍िल्‍ली - लडाखमध्ये चीनने भारतीय हद्दीत केलेल्या घुसखोरीवर मोठा खुलासा झाला आहे. सूत्रांनी दिल्ल्या माहितीनुसूर, चिनी राष्ट्रपती शी ...

xi jinping ordered chinese army to infiltrate in indian lac | मैत्रीच्या आडून चिनी राष्ट्रपतींची बेईमानी, ...म्हणून लडाखमध्ये ड्रॅगन सैन्याने केली होती घुसखोरी

मैत्रीच्या आडून चिनी राष्ट्रपतींची बेईमानी, ...म्हणून लडाखमध्ये ड्रॅगन सैन्याने केली होती घुसखोरी

Next
ठळक मुद्देसंपूर्ण तयारीनंतर चीनी सैनिकांनी प्रत्यक्ष सीमा रेषेवर घुसखोरी  करण्याचा प्रयत्न केला होता.चीन आणि भारतीय सैनिकांत हिंसक झटापट झाली होती. त्यात भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले. पेंगाँग सरोवराच्या भागातील फिंगर चारवरून चीनी सैन्य मागे हटले असले तरी, ते अद्यापही फिंगर 5 वर आहेच.

पेइचिंग/नवी द‍िल्‍ली -लडाखमध्येचीननेभारतीय हद्दीत केलेल्या घुसखोरीवर मोठा खुलासा झाला आहे. सूत्रांनी दिल्ल्या माहितीनुसूर, चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी मे महिन्यात झालेल्या घुसखोरीच्या काही महिने आधीच घुसखोरीचे आदेश दिले होते. यानंतर संपूर्ण तयारीनंतर चीनी सैनिकांनी प्रत्यक्ष सीमा रेषेवर घुसखोरी  करण्याचा प्रयत्न केला होता.

चीनची सरकारी वृत्तसंस्था सिन्‍हुआनेदेखील आपल्या एका वृत्तात म्हटले होते, की शी जिनपिंग यांनी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या पहिल्या आदेशात 'सैन्‍य प्रशिक्षणा'साठी सैनिकांच्या तैनातीचा आदेश दिला होता. 

द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, काही महिन्यांच्या तयारीनंतरच गलवान खोरे, पेंगाँग सरोवर आणि एलएसीला लागून असलेल्या भारताच्या इतर काही भागांत चिनी सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. शी जिनपिंग यांनी जानेवारी महिन्यात दिलेल्या आदेशानंतर ही तयारी करण्यात आली होती. यासाठी चीनने जबरदस्त रणनीती आखली होती. या रणनीतीनुसार चीनने अनेक ठिकाणी आपल्या सैनिकांची संख्या वाढवली होती. यामुळेच चीन आणि भारतीय सैनिकांत हिंसक झटापट झाली होती. त्यात भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले. तर चीनचे जवळपास 35 सैनिक मारले गेले होते.

उच्‍च स्‍तरावर करण्यात आली प्लॅनिंग -
भारतीय अधिकाऱ्यांच्यामते, या सर्व घटनांकडे पाहता, याची प्लॅनिंग उच्‍च स्‍तरावर करण्यात आली होती. ते म्हणाले, गलवान खोरो आणि पेंगाँग सरोवराच्या भागांत भारताला एलएसीपासून मागे ढकलता येईल आणि हा भाग सहजपणे चीनच्या आधिकृत सीमेला जोडता येईल, अशा पद्धतीने चिनी सैन्य तैनात करण्यात आले होते. 

पेंगाँग सरोवराच्या भागातील फिंगर चारवरून चीनी सैन्य मागे हटले असले तरी, ते अद्यापही फिंगर 5 वर आहेच. यापूर्वी भारत फिंगर 8 पर्यंत गस्त घालत होता. फिंगर 8 पासून फिंगर 4 पर्यंतचे अंतर जवळपास 8 किमी एवढे आहे. सांगण्यात येते, की शी जिनपिंग यांच्या आदेशानंतर जानेवारी महिन्याच्या अखेरीस आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला पीएलएने लडाख शिनजियांग प्रांतात युद्धाभ्यासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर सैन्याची जमवाजमव करायला सुरुवात केली होती. 

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus : खूशखबर! कोरोना व्हॅक्‍सीनवर रशियानं मारली 'बाजी'; सेचेनोव्ह विद्यापीठाचा दावा, सर्व प्रकारचे परीक्षण यशस्वी

CoronaVirus : मोलकरणीच्या नावानं पाठवलं पत्नीचं Corona सॅम्पल, रिपोर्ट आला पॉजिटिव्ह!; मग...

धक्कादायक! : हनीट्रॅप अन् 9 कोटी 'हेर'; धूर्त चीन अशी करतो जगाची 'हेरगिरी'

CoronaVirus News: कोरोना व्हायरसवरील सर्वात प्रभावी, सुरक्षित अन् स्वस्त औषध 'Dexamethasone'; संशोधकांचा दावा

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर

CoronaVirus : आता उत्तर प्रदेशात लॉकडाउनचा नवा फॉर्म्युला, असा आहे योगी सरकारचा 'प्लॅन'

Web Title: xi jinping ordered chinese army to infiltrate in indian lac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.