Xi Jinping: शी जिनपिंग यांनी इतिहास रचला, तिसऱ्यांदा कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस बनले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 11:33 AM2022-10-23T11:33:05+5:302022-10-23T11:33:34+5:30
निवृत्तीचे वयही ६८ वर्षे निश्चित करण्यात आले होते. मात्र, सर्व नियम डावलून 69 वर्षांचे असूनही जिनपिंग या पदावर आहेत.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे तिसऱ्यांदा कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (CCP) चे सरचिटणीस बनले आहेत. चीनचे सर्वात मोठे नेते आणि सीसीपीचे संस्थापक माओ-त्से-तुंग यांच्यानंतर तिसऱ्यांदा नियुक्त होणारे जिनपिंग हे चीनमधील दुसरे व्यक्ती ठरले आहेत. आता जिनपिंग ५ वर्षे या पदावर राहतील.
यापूर्वी जिनपिंग यांची सीसीपीच्या केंद्रीय समितीचे नेते म्हणून निवड झाली होती. या समितीचा कार्यकाळ दोन पेक्षा अधिक वेळा वाढविता येत नाही. निवृत्तीचे वयही ६८ वर्षे निश्चित करण्यात आले होते. मात्र, सर्व नियम डावलून 69 वर्षांचे असूनही जिनपिंग या पदावर आहेत.
केंद्रीय समितीच्या सदस्यांनी रविवारी 25 सदस्यीय पॉलिट ब्युरोची निवड केली. या पॉलिट ब्युरोने स्थायी समितीचे 7 सदस्य निवडले. या 7 सदस्यांनी जिनपिंग यांची तिसऱ्यांदा कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस म्हणून निवड केली. तत्पूर्वी जिनपिंग यांनी शनिवारी २० व्या बैठकीला संबोधित केले होते. यामध्ये त्यांनी चीनच्या जनतेला संघर्षाने जिंकण्याची हिंमत दाखवायला सांगितले. कठोर परिश्रम करा आणि पुढे जाण्याचा निर्धार करा. लोकांनी वादळाचा सामना करण्यासाठी तयार राहावे, असे ते म्हणाले होते.