Xi Jinping: चीनमध्ये पुन्हा जिनपिंग राज! सर्वसंमतीने तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदी निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 10:21 AM2023-03-10T10:21:12+5:302023-03-10T10:21:27+5:30

जिनपिंग यांच्या विरोधात पक्षातून दुसरा उमेदवार उभा राहिला नाही. तरीही मतदान घेण्यात आले.

Xi Jinping reigns again in China! Elected to the post of President for the third time by consensus | Xi Jinping: चीनमध्ये पुन्हा जिनपिंग राज! सर्वसंमतीने तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदी निवड

Xi Jinping: चीनमध्ये पुन्हा जिनपिंग राज! सर्वसंमतीने तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदी निवड

googlenewsNext

चीनमध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविरोधात लाट असल्याचे सांगितले जात होते. कोरोना काळातील कठोर निर्बंध आणि हुकुमशाही सारखा कारभार यामुळे कम्युनिस्ट पक्षातही त्यांच्याविरोधात अस्वस्थता होती. असे असतानाही जिनपिंग यांना सर्वानुमते पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष बनविण्यात आले आहे. 

जिनपिंग यांच्या विरोधात पक्षातून दुसरा उमेदवार उभा राहिला नाही. यामुळे त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा करण्यात आली. माओत्से तुंग यांच्यानंतरचे सर्वात शक्तीशाली नेते म्हणून जिनपिंग यांनी चीनवर पकड मजबूत केली आहे. 

चीनच्या रबर-स्टॅम्प संसदेच्या जवळपास 3,000 सदस्यांनी, नॅशनल पीपल्स काँग्रेस (NPC) ने एकमताने जिनपिंग यांना मतदान केले. 69 वर्षीय शी यांच्यासाठी ग्रेट हॉल ऑफ द पीपल येथे मतदान पार पडले. समोर कोणी प्रतिस्पर्धी नसला तरी हे मतदान घेण्यात आले. हे मतदान जवळपास १ तास सुरु होते. तर मोजणी १५ मिनिटांत पूर्ण झाली. तर संसदेचे अध्यक्ष म्हणून झाओ लेजी आणि उपाध्यक्ष म्हणून हान झेंग यांची निवड करण्यात आली. 

जिनपिंग यांनी २०१८ मध्येच राष्ट्राध्यक्ष पदाच्या कार्यकाळाची मर्यादा संपुष्टात आणली होती. गेल्या ऑक्टोबरमध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीच्या सरचिटणीसपदी आणखी पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. याचबरोबर शी जिनपिंग यांना केंद्रीय सैन्य आयोगाचे तिसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून देखील निवडण्यात आले आहे. 

Web Title: Xi Jinping reigns again in China! Elected to the post of President for the third time by consensus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.