शी जिनपिंग यांनी बंड हाणून पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 03:28 AM2017-10-21T03:28:07+5:302017-10-21T03:28:22+5:30
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविरोधात भ्रष्टाचारविरोधी मोहीम छेडणा-या राजकीय प्रतिस्पर्ध्यांचे बंड हाणून पाडत सरकारवरील पकड मजबूत केल्याचा गौप्यस्फोट ज्येष्ठ अधिकारी लिऊ शियू यांनी केला आहे.
बीजिंग : चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविरोधात भ्रष्टाचारविरोधी मोहीम छेडणाºया राजकीय प्रतिस्पर्ध्यांचे बंड हाणून पाडत सरकारवरील पकड मजबूत केल्याचा गौप्यस्फोट ज्येष्ठ अधिकारी लिऊ शियू यांनी केला आहे.
शी जिनपिंग हे सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीसी) सरचिटणीस या नात्याने पुन्हा पाच वर्षांसाठी सत्ता काबीज करणार हे निश्चित असून त्यांनी पक्षाला बंडापासून वाचविले आहे, असे चीनच्या सिक्युरीटीज रेग्युलेटरीचे अध्यक्ष शियू यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी जोरदार भ्रष्टाचारविरोधी आंदोलन चालवत जिनपिंग यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. सीपीसीच्या काँग्रेसची बैठक पाच वर्षांतून एकदा होत असून त्या पार्श्वभूमीवर बोलताना शियू यांनी बंडाबद्दल वाच्यता केली. पक्षाचे माजी प्रमुख सन झेंगकाई यांचे नावही बंड पुकारणाºयांमध्ये आहे. झेंगकाई हे पॉलिटब्युरो स्थायी समितीच्या प्रमुखपदासाठी अग्रक्रमावर असलेले नाव होते. जिनपिंग यांनी झेंगकाई यांच्यासह त्यांच्या पत्नीची पक्षातून हकालपट्टी करीत त्यांच्याविरोधात शिस्तभंगाचा तपास सुरू केला आहे. जिनपिंग यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे बो हे सध्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. ६४ वर्षीय जिनपिंग यांना असलेला संभाव्य धोका पाहता त्यांच्या सुरक्षेत अभूतपूर्व वाढ करण्यात आली आहे.