YAHOO होणार इतिहासजमा
By admin | Published: January 10, 2017 03:40 PM2017-01-10T15:40:55+5:302017-01-10T15:40:55+5:30
YAHOOची कॉर्पोरेट ओळख लवकरच बदलण्याची शक्यता आहे.
ऑनलाइन लोकमत
सन फ्रान्सिस्को, दि. 10 -YAHOOची कॉर्पोरेट ओळख लवकरच बदलण्याची शक्यता आहे. कंपनीचं Altaba असं लवकरच नामकरण होणार असल्याची चर्चा आहे. कंपनीचा 4.8 अरब डॉलरचा वेराइजन करार झाल्यानंतर कंपनीच्या बोर्डाचं स्वरुपही छोटं होणार आहे.
याहू स्वतःची डिजिटल सर्व्हिसेस वेराइजन कम्युनिकेशनला विकण्याच्या तयारीत आहे. याअंतर्गत ईमेल, वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स, जाहिरातीचे टूल्स वेराइजनला मिळणार आहेत. त्यानंतर सीईओ मेरिसा मेयरलाही राजीनामा द्यावा लागणार आहे. या करारांतर्गत नवं नाव alternative and Alibaba यांच्या अक्षरातून निवडण्यात आलं आहे. याहूच्या 10 सदस्यांच्या बोर्डात सध्या सीईओ मेरिसा मेयरसह चार डायरेक्टर आहेत. वेराइजन करारानंतर सर्व बोर्डाचे सदस्य राजीनामा देतील. मात्र मध्यंतरी याहूचे अकाऊंट हॅक झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांनंतर हा करार धोक्यात आला होता. या हॅकिंगमध्ये 1 अरबहून जास्त युजर्सच्या अकाऊंटची वैयक्तिक माहिती चोरीला गेली होती.
या कराराअंतर्गत एरिक ब्रांट यांना कंपनीचे चेअरमन बनवण्यात आलं. वेब वेराइजन करार पूर्ण होईपर्यंत एमिरटसही चेअरमनपदावर कार्यरत राहणार आहेत. याहूमध्ये 15 टक्के शेअर्स हे अलिबाबाचे आहेत. या करारानंतर चिनी कंपनी अलिबाबाच्या शेअर्सशिवाय काही विकणार नसल्याचीही माहिती मिळाली आहे.