यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी - मोदींची अफगाणांना फिल्मी साद

By admin | Published: December 25, 2015 12:52 PM2015-12-25T12:52:29+5:302015-12-25T13:37:30+5:30

जंजीर सिनेमामधल्या शेरखानची प्रतिमा हे सर्वसामान्य भारतीयांच्या मनातल्या अफगाणिस्तानच्या पठाणासारखी आहे. यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी हा

Yari is Imaan Maar Yaar Marie Zindagi - Modi's Afghan filmmaker Saad | यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी - मोदींची अफगाणांना फिल्मी साद

यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी - मोदींची अफगाणांना फिल्मी साद

Next
>ऑनलाइन लोकमत
काबूल, दि. २५ - जंजीर सिनेमामधल्या शेरखानची प्रतिमा हे सर्वसामान्य भारतीयांच्या मनातल्या अफगाणिस्तानच्या पठाणासारखी आहे. यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी हा भारत व अफगाणिस्तानमधला दुवा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अफगाणिस्तानच्या संसदेमध्ये भाषण करताना सांगितलं आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. अफगाणिस्तानच्या संसदेची इमारत भारतीय तंत्रज्ञांनी बांधली असून तिच उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं. भारत व अफगाणिस्तान कायम एकमेकांचे मित्र राहतिल अशी ग्वाही देत शांततेच्या मार्गाने अफगाणिस्तान जाईल आणि उज्ज्वल भवितव्य घडवेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. आयटीचा अर्थ अफगाणिस्तानच्या तरुणांनी इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी असा घ्यावा इंटरनॅशनल टेररिझम असा नाही असं सांगत दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्याची गरज मोदींनी यावेळी व्यक्त केली.
तुम्हाला होणारा त्रास हे आमचं दु:ख आहे, तुमच्या स्वप्नांची पूर्ती हे आमचं कर्तव्य आहे, तुमचं धैर्य ही आमची स्फूर्ती आहे, आणि या सगळ्याच्या वर तुमची मैत्री हा आमचा सन्मान आहे अशा शब्दांमध्ये नरेंद्र मोदींनी अफगाणिस्तानला मैत्रीची साद घातली आणि अफगाण मंत्र्यांनी टाळ्यांच्या कडकडाट त्यांना दाद दिली.
 
मोदींच्या भाषणातील मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे:
 
- पाकिस्तान दक्षिण आशिया व अफगाणिस्तानदरम्यान दुवा बनेल, अशी मला आशा आहे.
- महाकाय हिंदुकूश पर्वत आणि खैबर खिंडीइतके जुने ऐतिहासिक संबंध भारत व अफगाणिस्तानचे आहेत. महाभारतातील गांधारी अफगाणिस्तानच्या गांधारची होती.
- अफगाणिस्तानातील नागरिकांनाही शांततेत जीवन जगण्याचा हक्क आहे. दहशतवाद आणि हिंसा हे अफगाणिस्तानचे भविष्य घडवू शकत नाहीत.
- सीमेवरील दहशतवादाचे समूळ उच्चाटन झाल्यानंतरच अफगाणिस्तानचा विकास होऊ शकेल.
- भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराक यांनी एकजूट व्हायला हवे.
- भारत नेहमीच अफगाणिस्तानची मदत करत राहील. आम्ही इथे भविष्याचा पाया रचण्यासाठी आलो आहोत, मतभेदाची ठिणगी पेटवण्यासाठी नव्हे.
- आपण एकत्र येऊन बांधलेल्या रस्त्यांमुळे आपले संबंध मजबूत झाले. पॉवर ट्रान्समिशन लाइन व पॉवर स्टेशनमुळे अफगाणिस्तानातील घरे उजळली.
- अफगाणिस्तान सुरक्षा दलातील शहीद जवानांच्या मुलांसाठी ५०० शिष्यवृत्ती देण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली
- संसदेची ही इमारत म्हणजे भावना, आपली मूल्यं, स्नेह आणि अपेक्षांचे प्रतीक आहे. प्रत्येक भारतीय व अफगाणी नागरिकाच्या हृद्यात एकमेकांबद्दल निरतिशय प्रेम आहे.
- अफगाणिस्तानच्या संसदेच्या इमारतीच्या एका भागाला आमच्या देशाला लाभलेले सर्वात उत्तम पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव ( अटल ब्लॉक) दिल्याने मी अतिशय भारावलो आहे.
- अफगाणिस्तानचे उज्ज्वल भविष्य मतदान व चर्चेतून घडेल, शस्त्र आणि हिंसेच्या जोरावर नाही. बुलेटला बॅलेटने हरवणं हे आपलं उद्दिष्ट आहे.
- रुमी यांनी एकदा म्हटले होते, 'तुमचा मुद्दा ठोसपणे मांडा, आवाज वाढवू नका' , हाच या महान देशाचा समजुतदारपणा आहे.

Web Title: Yari is Imaan Maar Yaar Marie Zindagi - Modi's Afghan filmmaker Saad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.