लैंगिक अत्याचारप्रकरणी योगा गुरू बिक्रम चौधरींना एक दशलक्ष डॉलर्सचा दंड
By admin | Published: January 26, 2016 03:07 PM2016-01-26T15:07:59+5:302016-01-26T15:12:19+5:30
भारतीय वंशाचे अमेरिकी गुरू बिक्रम चौधरी यांना न्यायालयाने महिला वकिलाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी ९.२४ लाख डॉलर्सची नुकसानभरपाई ठोठावली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
लॉस एंजलिस, दि. २६ - भारतीय वंशाचे अमेरिकी गुरू बिक्रम चौधरी यांना न्यायालयाने महिला वकिलाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी ९.२४ लाख डॉलर्सची नुकसानभरपाई ठोठावली आहे. चौधरींच्या विरोधात अन्य महिलांनी केलेल्या लैंगिक छळाच्या तक्रारींचा तपास करणे, तसेच वकिल म्हणून दिलेले काम काढून घेतल्याचा आरोपही चौधरींवर मिनाक्ष जफा बोडेन यांनी केला होता.
चौधरींसाठी काम करताना, लैंगिक भेदभाव, चुकीच्या पद्धतीने काम काढून घेणे आणि लैंगिक छळ या गोष्टींना सामोरे जावे लागल्याचा आरोप मिनाक्षी यांनी केला होता.
लॉस एंजलिसच्या न्यायालयाने मिनाक्षी यांच्या बाजुने कौल दिला आहे. चौधरी यांनी लैंगिक छळाचा आरोप पूर्णपणे धुडकावला होता, आणि अमेरिकेत वकिली करण्याचा परवाना मिनाक्षीकडे नसल्याचा दावाही आपली बाजू मांडताना केला होता. मिनाक्षी धडधडीत असत्य सांगत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला होता.
चौधरी यांनी फसवणूक केल्याचे, जोरजबरदस्ती केल्याचे तसेच द्वेषपूर्ण वर्तन केल्याचे ज्युरींना आढळल्याचे लॉस एंजलिस टाइम्सने म्हटले आहे.
चौधरींवर एका विद्यार्थिनीने बलात्काराचा आरोपही केला होता. यासह चौधरींविरोधात असलेल्या अन्य मुलींच्या तक्रारीची चौकशीही मिनाक्षी करत होत्या. महिलांवर अत्याचार झाला तर त्यांनी काय करायला हवं, याचा नमुना म्हणून ही केस हे उदाहरण असल्याचं मत काही जणांनी व्यक्त केलं आहे.
१९७१ मध्ये कॅलिफोर्नियाला गेल्यानंतर बिक्रम चौधरींनी योगाच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून साम्राज्य उभं केलं. त्यांच्या पद्धतीमध्ये १०४ अंश सेल्सियस एवढं तापमान असलेल्या खोलीत ९० मिनिटांमध्ये योगाचे २६ प्रकार करण्यात येतात. या चौधरींविरोधात लैंगिक अत्याचारासी संबंधित आणखी प्रकरणे सुरू आहेत.