येमेनचे पंतप्रधान हल्ल्यातून बचावले
By admin | Published: October 7, 2015 03:37 AM2015-10-07T03:37:53+5:302015-10-07T03:37:53+5:30
इराणसमर्थक बंडखोरांनी हॉटेलवर केलेल्या हल्ल्यातून येमेनचे पंतप्रधान बालंबाल बचावले. अशाच एका अन्य हल्ल्यात मित्रदेशांचे १५ सैनिक ठार झाले. हे शहर बंडखोरांच्या
एडन : इराणसमर्थक बंडखोरांनी हॉटेलवर केलेल्या हल्ल्यातून येमेनचे पंतप्रधान बालंबाल बचावले. अशाच एका अन्य हल्ल्यात मित्रदेशांचे १५ सैनिक ठार झाले. हे शहर बंडखोरांच्या ताब्यातून घेऊन काही आठवडे झाले असताना ही घटना घडली.
पंतप्रधान खालेद बहाह यांचे वास्तव्य असलेल्या अल्-कसर या हॉटेलवर तसेच दक्षिण भागातील लष्कराच्या अन्य आस्थापनांवर हे हल्ले झाल्याचे सरकारी प्रवक्त्याने सांगितले. या बहुमजली हॉटेलच्या इमारतीवर दोन रॉकेटस् आदळले; मात्र तिसऱ्या रॉकेटचा निशाणा हुकला आणि ते जवळच समुद्रात कोसळले. हॉटेलवरील हल्ल्यामुळे आग लागून प्रचंड धूर निघाला. मात्र पंतप्रधान सुखरूप असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचे युवक आणि क्रीडामंत्री नायक अल-बकरी यांनी सांगितले. हल्लेखोरांनी कितीही हल्ले केले तरीही एडनमध्ये आमचेच सरकार राहील.