आधीच युद्ध, त्यात कोरोना, येमेन संकटाच्या खाईत!
By meghana.dhoke | Published: April 20, 2020 02:41 PM2020-04-20T14:41:01+5:302020-04-20T14:44:13+5:30
येमेनी माणसाला लॉकडाउन आणि आयसोलेशन नवं नाही, त्यात पहिला कोरोना बाधित सापडला.
शुक्रवारचीच गोष्ट, येमेनमध्ये पहिलावहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडला. त्याची तब्येत आता हळूहळू सुधारते आहे. ते प्रमाण वाढणार नाही, आम्ही सगळा कडेकोट बंदोबस्त केला आहे असं येमेनमधून अधिकृतरित्या सांगण्यात येत आहे.
पण सांगणारे आहेत, ते आधिकृत का? नेमके अधिकृत सरकार कुणाचे असा प्रश्नही तिथं आहे.
त्या प्रश्नाच्या खोलात जाण्यापूर्वी ही एका येमेनी शेफ आणि अरेबिक अनुवादक आहे.
गेले अनेक दिवस तो आठडडय़ातून दोनदा आपल्या युटय़ूब चॅनलदद्वारे ‘ आयसोलेशनमधले दिवस’ अशी कहाणी सांगतोय. तिथं जगायचं कसं? आनंदानं कसं जगायचं हे सांगतोय. इटालियन माणसांना.
तो सध्या राहतो इटालीत. मिलानमध्ये. एका इटालीयन मुलीशी त्यानं दोन वर्षापूर्वी लग्न केलं आणि येमेन सोडलं.
सध्या संपूर्ण इटलीतच लॉकडाउन असल्यानं तो इटलीवासियांना सांगतोय की, आम्ही येमेनमध्ये तर कायमचेच आयसोलेट आहोत, जन्मालाच आमच्या लॉकडाउन पुजलंय. आम्ही कसे जगतो, हे पहा. हे ही दिवस जातील, आनंदाने जगा!’
सध्या त्याचं हे चॅनल लोकप्रिय होतं आहे. त्याचं कारण त्याच्या आणि पर्यायानं येमेनी माणसांच्या जगण्याची कहाणी. येमेनमध्ये युद्ध पेटलं, त्यानंतर अनेक येमेनी युरोपियन देशात स्थलांतरीत झाले. स्थलांतरीतांचे लोंढे म्हणून स्थानिकांनी नाकं मुरडली.
आता लॉकडाउनच्या काळात हा येमेनी शेफ , त्याचं नाव ताहा अल जलाल युद्धग्रस्त काळातही उमेद पोटाशी धरुन येमेनी माणसं कशी जगत आहेत, आणि त्यातून काही उमेद वाटता येतेय का हे पाहत आपले अनुभव सांगतो आहे.
2015 पासून ताहा मिलानमध्ये राहतो. तो एका इटालियन मुलीच्या प्रेमात पडला, तिच्याशी लग्न करायचं म्हणून मिलानला आला. 2015 मध्येच त्यांनी लगA केलं. 2015 ला ते येमेनला त्याच्य कुटुंबाला भेटायला म्हणून गेले. बेचिराख झालेला देश. माणसं घरात कोंडलेली.
बंकर करुन राहावं तसं राहणारी. त्यावेळी परत येताना म्हणजे 2क्16 साली त्यांना येमेन आणि ओमानच्या बॉर्डरवर डिटेन करण्यात आलं. सगळी कागदपत्रं होती तरी चौकशीसाठी थांबवण्यात आलं. ती गोष्ट ताहा सांगतो.
तो म्हणतो, अशा चौकशीचा अनुभव मला नवा नव्हता, पण माङया इटलीयन बायकोला हे नवीन होतं. आम्हाला तीन दिवस एका लहानशा हॉलमध्ये ठेवण्यात आलं. तिथं माणसांची प्रचंड गर्दी. सगळेच देश सोडून जीव मुठीत घेऊन निघालेले, तसे सधन. पण आता देश सोडण्यावाचून पर्याय नसलेले.
तीन दिवस आम्ही तिथं होतं, फक्त बसून. पोटापुरतं खायला आणि पाणी देत. तिथं वायफाय नव्हतं, बाहेरचं जग दिसायचं नाही. लोक सगळेच अस्वस्थ, तिथून बाहेर पडण्यासाठी कासाविस झालेले. त्या अवस्थेतही आम्ही जगलो. हळूहळू एकमेकांशी दोस्ती झाली. सुखदु:ख वाटली. मी हेच सांगतोय, माङया चॅनलद्वारे की, माणसं प्रेमळ असतात. त्यांच्यावर भरवसा ठेवा. आणि स्वत:वरही. आपली जीवनेच्छा अशी दांडगी असते की माणूस म्हणून आपण कोणत्याही परिस्थितीत जगू शकतो, जगायचा प्रयत्न करतो. हार मानत नाही.
तेच आता लॉकडाउनमध्ये करायची गरज आहे.’
तो म्हणतो, ‘ मी स्वत: एका परक्या देशात अडकलो आहे. माझं कुटुंब युद्धग्रस्त देशात त्यांच्या जीवीताची खातरी नाही. पुढे काय होईल माहिती नाही. तरी आम्ही जगतोच आहोत ना, येमेनी माणूस जर भयंकर युद्धात जपू शकतो तर मग बाकी जग घरात सुरक्षित का नाही जगू शकत?’
ताहा म्हणतोय ते खरं आहे, गेलं दशकभर येमेन धुमसतं आहे. 2010/11 मध्ये अरब स्प्रिंग नंतर येमेनचे सत्ताधिश अली अब्दुल्ला सलेह यांची सत्ता गेली. ते तीन दशकं येमेनचे सत्ताधिश होते. त्यांच्या पश्चात मात्र गृहयुद्ध भडकलं. 2014 पासून तर ते जास्तच गंभीर झालं. युद्धच सुरु झालं. बंडखोर ‘हाऊथी’ म्हणवणा:या गटाने एकेक करत येमेनचा भाग ताब्यात घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी लढाई सुरु झाली. आजही येमेनचा बहुतांश भाग त्यांच्या अखत्यारित आहे.
सरकार तर पदच्यूतच आहे. कोरोनामुळे सारं जग संकटात असतानाही त्यांनी युद्धबंदी जाहीर केलेली नाही.
एकीकडे युद्ध आणि दुसरीकडे कोरोना अशी स्थिती आहे. माणसं जीव मुठीत धरुन जगत आहेत. आता येमेनच्या सीमा बंद करण्यात आल्या असून जगापासून संपर्क पूर्ण तोडण्यात आला आहे.
संयुक्त राष्ट्रसंघानंही सांगितलं की, युद्ध आणि कोरोना त्यापायी जाणारे जीव हे दोन्ही एकदम येमेनला झेपणारे नाही, जरा सबुरीनं घ्या, तुमची आरोग्य यंत्रणा मुळात खिळखिळी आहे, त्यात भर नको.
शुक्रवारी पहिला बाधित कोरोनात सापडला, आता पुढं त्याचा संसर्ग होणार नाही या प्रार्थनेपलिकडे स्थानिक लोक तिथं आता काहीही करू शकत नाहीत.