होय, भारतात हल्ले केले

By admin | Published: July 4, 2017 01:20 AM2017-07-04T01:20:02+5:302017-07-04T01:23:10+5:30

हिजबुल मुजाहिदीनने भारतात दहशतवादी हल्ले केल्याची कबुली देत हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या सईद सलाहुद्दीनने स्वत:हून

Yes, attacks in India | होय, भारतात हल्ले केले

होय, भारतात हल्ले केले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : हिजबुल मुजाहिदीनने भारतात दहशतवादी हल्ले केल्याची कबुली देत हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या सईद सलाहुद्दीनने स्वत:हून आपण दहशतवादी असल्याचे सिद्ध केले आहे. अमेरिकेने अलीकडेच त्याला जागतिक दहशतवादी घोषित केले असून, अमेरिकेची ही कारवाई उचित असल्याचे त्याच्या कबुलीवरून स्पष्ट होते. सोबतच पाकिस्तानच्या भूमीचा भारताविरुद्ध दहशतवादी कारवायांसाठी वापर होतो, या भारताच्या दाव्यालाही पुष्टी मिळते.
जिओ टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सलाहुद्दीनने मेखी मिरवत भारतातील दहशतवादी कारवायांची कबुली दिली. आमचे लक्ष भारतीय सुरक्षा दलांवर आहे. आम्ही ज्या कारवाया केल्या-करणार आहोत, त्या सर्व भारतीय सुरक्षा दलावर केंद्रित आहेते.
हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या असलेल्या सलाहुद्दीन याने मागच्या वर्षी धमकीही दिली होती की, भारतीय सुरक्षा दलांसाठी काश्मीर खोऱ्याला स्मशान बनवू. काश्मीर आपले घर आहे. बुऱ्हान वनी मारला गेल्यापासून काश्मीर खोऱ्यात बंडखोरी वाढली आहे. भारतात आमचे अनेक समर्थक आहेत. आम्ही भारतात कुठेही हल्ले करू शकतो, असे सांगत त्याने विदेशातून शस्त्रास्त्र खरेदीचीही कबुली दिली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये तो ठाण मांडून आहे.

कारवाई अनुचित
जागतिक दहशतवादी घोषित करण्याची अमेरिकेची कारवाई पूर्णत: अनुचित आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वेडसर आहेत. त्यांचे प्रशासनही वेडपट आहे. भारताला बक्षिसी म्हणून हा निर्णय घेण्यात आला. तथापि, आमचा आत्मविश्वास डगमणार नाही, अशी दर्पोक्तीही त्याने केली.

शिक्का स्वत:च सार्थ ठरविला
भारतात याआधी अनेक दहशतवादी कृत्ये केल्याची कबुली देऊन सैयद सलाहउद्दीन याने त्याच्यावर अमेरिकेने ‘जागतिक दहशतवादी’ असा मारलेला शिक्का स्वत:च सार्थक ठरविला आहे, अशी प्रतिक्रिया भारताने दिली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अशोक प्रसाद म्हणाले की, भारतातील दहशतवादी कारवायांना आणि त्या घडवून आणणाऱ्यांना सलाहउद्दीनकडून वित्तीय तसेच अन्य प्रकारची मदत मिळते, हे आम्ही पूर्वीपासूनच सांगत आलो आहोत. आता त्याने स्वत:च कबुली देऊन आपले खरे रूप प्रकट केले आहे.

Web Title: Yes, attacks in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.