कुत्र्यासोबत योगाचा, डोगाचा नवा विश्वविक्रम
By admin | Published: March 17, 2016 01:25 PM2016-03-17T13:25:24+5:302016-03-17T13:25:24+5:30
ज्यावेळी कुत्रे आणि त्यांचे मालक एकत्र योगा करतात त्याला डोगा म्हणतात. नुकताच हाँगकाँगमधल्या 270 जणांनी आपापल्या कुत्र्यांसोबत अर्धातास योगा केला आणि नवा विश्वविक्रम केला
Next
>- योगेश मेहेंदळे
ज्यावेळी कुत्रे आणि त्यांचे मालक एकत्र योगा करतात त्याला डोगा म्हणतात. नुकताच हाँगकाँगमधल्या 270 जणांनी आपापल्या कुत्र्यांसोबत अर्धातास योगा केला आणि नवा विश्वविक्रम केला जो गिनिज बुकमध्ये नोंदला गेला आहे. याआधी 265 जणांनी डोगा केल्याचा विक्रम होता.
गेली काही वर्षे तंदुरूस्त राहण्यासाठी या प्रकाराचा वापर होत होता, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या तीन ते चार वर्षांपासून याला चालना मिळाली. 2015 मध्ये 265 जणांनी अमेरिकेमध्ये डोगा केला आणि या विश्वविक्रमाची नोंद झाल्यानंतर अनेक देशांमध्ये चढाओढ लागली. ज्या शहरांमध्ये करीअरशी संबंधित ताणतणाव मोठ्या प्रमाणावर असतात त्या शहरांमध्ये डॉग योगाला मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचं दिसून आलं आहे.
हाँगकाँगमधल्या या कार्यक्रमाचे आयोजक सुझेट अॅकरमन यांच्या सांगण्यानुसार पाळीव प्राण्याबरोबर चांगला वेळ घालवला तर कामाचा ताण कमी होतो. डोगामुळे ही संधी कुत्र्यांच्या मालकांना मिळते.
प्रथमच या प्रकारचा योगा करणाऱ्यांना साधे व्यायामाचे प्रकार करायला सांगितले जातात, तर यात तरबेज झालेल्यांना योगासने शिकवली जातात. त्यानंतर, कठीण अशी योगासने त्यांना करण्यास सांगण्यात येतात.
हाँगकाँगमधल्या या विश्वविक्रमानंतर मियामीमधल्या आयोजकांनी पुडील वर्षी हा विक्रम तोडण्याचं आव्हान स्वीकारलं आहे.