या 'व्हॅलंटाईन डे'ला तुमच्या EXला तुम्ही प्राण्यांना खायला घालू शकता, प्राणीसंग्रहालयानं आणलीय नामी संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 02:29 PM2022-02-04T14:29:22+5:302022-02-04T14:33:50+5:30

प्राणी संग्रहालयानं एक नामी संधी आणलीय. याद्वारे तुम्ही सुडाची भावना शांत करु शकतातच पण तुम्ही कसा सुड घेतला तेही तुमच्या एक्सला कळवू शकता. हे सर्व शक्य आहे फक्त ३६४ रुपयात. जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल तर पुढे वाचाच...

You can name a cockroach after your ex and animals will eat it on this Valentine's Day | या 'व्हॅलंटाईन डे'ला तुमच्या EXला तुम्ही प्राण्यांना खायला घालू शकता, प्राणीसंग्रहालयानं आणलीय नामी संधी

या 'व्हॅलंटाईन डे'ला तुमच्या EXला तुम्ही प्राण्यांना खायला घालू शकता, प्राणीसंग्रहालयानं आणलीय नामी संधी

Next

व्हॅलंटाईन जे जसा जवळ येऊ लागतो तसं कपल्समध्ये उत्साह संचारतो. काय करायचं? काय गिफ्ट द्यायचं याचे प्लान आकाराल येऊ लागतात. पण व्हॅलंटाईन डे च्या दिवशी एक्सला गिफ्ट द्यायची संकल्पना कशी वाटतेय? अहो पॅच अपसाठी नाही तर सुड घेण्यासाठी. अनेकांना ब्रेकअप झाल्यानंतर आपल्या एक्स विषयी राग असतो. तो व्यक्त करण्यासाठी आणि सुडाची भावना शांत करण्यासाठी प्राणी संग्रहालयानं एक नामी संधी आणलीय. याद्वारे तुम्ही सुडाची भावना शांत करु शकतातच पण तुम्ही कसा सुड घेतला तेही तुमच्या एक्सला कळवू शकता. हे सर्व शक्य आहे फक्त ३६४ रुपयात. जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल तर पुढे वाचाच...

पेनसिल्व्हेनियामधील लिहाई व्हॅली झूसारख्या (Lehigh Valley Zoo) काही प्राणीसंग्रहालयांनी अनोखी कल्पना समोर आणली आहे. या झूमध्ये तुम्ही तुमच्या एक्सच्या नावाचा कीडा पाळू शकता! यासाठी प्राणीसंग्रहालयात पाच डॉलर्सचं डोनेशन घेतलं जाणार आहे (374 रुपये). तुमच्या एक्सच्या नावाचा कीडा प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांना खाऊ घातला जाईल. या माध्यमातून झू तुम्हाला तुमच्या पास्ट रिलेशनशीपच्या आठवणींमधून बाहेर पडण्यास मदत करणार आहे.

लिहाई झूनं या वर्षीच्या व्हेलेंटाईन डेसाठी त्यांच्या ट्विटर पेजवर एक खास ऑफरसह जाहिरात केली आहे. झूनं जाहीर केलेल्या पोस्टरमध्ये लिहिलं आहे की, 'किड्याला तुमच्या एक्सचं नाव द्या आणि आम्ही ते आमच्या प्राण्यांना खायला घालू!' किड्याला एक्सचं नाव देण्यासाठी ३६४ रुपये आकारले जातील. हे पैसे नंतर एखाद्या प्राण्याच्या संगोपनासाठी वापरले जातील, असंही जाहिरातीत सांगण्यात आलं आहे.

लिहाई प्राणीसंग्रहालयाच्या वेबसाइटनुसार, हे प्राणीसंग्रहालय फेसबुक पेजवर विकली व्हिडीओदेखील पोस्ट करणार आहे. या व्हिडिओमध्ये लोक त्यांच्या एक्सच्या नावाचा कीडा प्राण्यांना खाऊ घातला जाताना पाहू शकतील. तुम्ही हे व्हिडिओ तुमच्या एक्सला पाठवून तुमचा आत्मा अगदी शांतही करु शकता.

दरम्यान, सॅन अँटोनियो झूलॉजिकल सोसायटीनंसुद्धा (San Antonio Zoological Society) असाच काहीसा उपक्रम सुरू केला आहे. या ठिकाणी ‘क्राय मी अ कॉकरोच’ (Cry Me a Cockroach) इव्हेंटमध्ये लोकं झुरळ किंवा उंदराना त्यांच्या एक्स नाव ठेवू शकतात. दरवर्षी प्रत्येक व्हॅलेंटाईन डेला हा कार्यक्रम आयोजित केला जातो. झूलॉजिकल सोसायटी यासाठी लोकांना आमंत्रित करते. या वर्षी देखील, झूलॉजिकल सोसायटीनं त्यांच्या ट्विटर पेजवर पोस्ट केलेल्या व्हिडीओद्वारे कार्यक्रमाची जाहिरात केली आहे. 'आजच डोनेशन द्या. आम्ही तुमच्या एक्सला प्राण्यांच्या तोंडी देऊ आणि तुम्हाला व्हिडीओ आणि प्रमाणपत्र पाठवू,' अशी जाहिरात सोसायटीनं केली आहे.

जाहिरातीमध्ये दिलेल्या व्हिडीओमध्ये हिप्पोपोटॅमस (hippopotamus), मॉनिटर सरडा (monitor lizard) यांसारख्या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या क्लिप आहेत. त्यांना एक्सची नाव असलेले उंदीर आणि कीटक खायला दिले जात असल्याचं व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातील लोक वेबसाइटद्वारे या इव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकतात आणि या अनोख्या पद्धतीनं त्यांच्या साचलेल्या भावना मोकळ्या करू शकतात.

पण, जर अशा पद्धतीनं किड्याला एक्सचं नाव देणं व तो कीडा प्राण्यांना खाऊ घालताना पाहणं तुम्हाला जास्त क्रूर वाटत असेल तर एक मधला मार्गसुद्धा प्राणीसंग्रहालयांनी काढला आहे. या व्हॅलेंटाईन डेला तुम्हाला चायेन माउंटन झूमध्ये (Cheyenne Mountain Zoo) प्राणी दत्तक (adopt ) घेऊन त्याला एक्सचं नाव देऊ शकता. यासाठी चायेन झूनं माउंटन लायन्सला दत्तक घेण्यासाठी लोकांना आमंत्रित केलं आहे. प्राणिसंग्रहालयाच्या वेबसाइटनुसार, दत्तक प्रक्रियेतून जमा झालेल्या डोनेशनचा वापर प्राणीसंग्रहालयातील सिंहाच्या संगोपनासाठी केला जाणार आहे.

Web Title: You can name a cockroach after your ex and animals will eat it on this Valentine's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.