तुम्हाला कामं नाहीत का? प्रिया प्रकाशविरोधात तक्रार करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 06:25 PM2018-08-31T18:25:32+5:302018-08-31T18:28:42+5:30
21 फ्रेबुवारी 2018 रोजी सर्वांची बाजू ऐकून घेतल्यानंतर प्रियाविरोधात कारवाई थांबवली होती.
Next
नवी दिल्ली- देशभरातीलविविध विषयांवर अनेक याचिका दाखल केल्या जातात. मात्र सर्वोच्च न्यायालयाने एक याचिका फेटाळून लावताना याचिकाकर्त्यांना तुम्हाला दुसरी काही कामं नाहीत का? असे विचारले. मल्याळी अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरची नेत्रपल्लवी करणारी व्हीडिओ क्लीप देशभरात गाजली होती. ओरु आडार लव या सिनेमामध्ये असलेले एक गाणे प्रसिद्ध झाल्यावर माध्यमांसह, टीकाकारांचेही लक्ष त्याकडे गेले होते.
Supreme Court today quashed an FIR registered in Telangana against actress Priya Prakash Varrier, in connection with the 'wink song'. (File pic) pic.twitter.com/YGyo7vbzln
— ANI (@ANI) August 31, 2018
या सिनेमातील 'मानिक्या मलराया पूवी' या गाण्यावर काही लोकांनी आक्षेप घेतला होता. हैदराबादमधील पोलीस स्थानकात तसेच मुंबईतही त्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या गाण्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या अशी तक्रार करण्यात आली होती.
''कोणीतरी सिनेमात गाणं म्हणतं आणि तुम्हाला त्याविरोधात तक्रार दाखल करण्याशिवाय दुसरं काही काम नाही'' अशी टिप्पणी करत सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी तेलंगण सरकारला खडसावले. त्याबरोबरच या सिनेमाविरोधातील याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली.
या सिनेमातील गाणे उत्तर केरळमधील मलबार प्रांतामध्ये पूर्वापार गायले जाते, तक्रार करणाऱ्यांचा गैरसमज झाला आहे असे मत प्रिया प्रकाश वारियरने न्यायालयात मांडले होते. 21 फ्रेबुवारी 2018 रोजी सर्वांची बाजू ऐकून घेतल्यानंतर प्रियाविरोधात कारवाई थांबवली होती.