"तुम्हाला चौथ्यांदा पंतप्रधान व्हायचंय," शहबाज यांचं नवाज शरीफ यांना परतीचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 09:28 AM2023-06-17T09:28:38+5:302023-06-17T09:29:38+5:30

पाकिस्तानमधील आर्थिक परिस्थितीसोबतच राजकीय संकटही आता गडद होत आहे.

You want to be prime minister for the fourth time pakistan pm Shehbaz sharif call back to Nawaz Sharif economic crisis | "तुम्हाला चौथ्यांदा पंतप्रधान व्हायचंय," शहबाज यांचं नवाज शरीफ यांना परतीचं आवाहन

"तुम्हाला चौथ्यांदा पंतप्रधान व्हायचंय," शहबाज यांचं नवाज शरीफ यांना परतीचं आवाहन

googlenewsNext

पाकिस्तानमधील आर्थिक परिस्थितीसोबतच राजकीय संकटही आता गडद होत आहे. दरम्यान, पाकिस्तानचेपंतप्रधान शहबाज शरीफ यांनी शुक्रवारी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे (पीएमएल-एन) सुप्रीमो नवाझ शरीफ यांना परतण्याची विनंती केली आहे. नवाझ शरीफ यांनी पुन्हा यावं आणि देशातील निवडणूक प्रचाराचं नेतृत्व करावं असं म्हणत त्यांनी नवाझ शरीफ यांना चौथ्यांदा पंतप्रधान होण्याचं आवाहनही केलंय.

जिओ न्यूजनुसार, नवाझ शरीफ हे आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव नोव्हेंबर २०१९ पासून लंडनमध्ये राहत आहेत. पीएमएल-एन पक्षाच्या सेंट्रल जनरल कौन्सिलच्या बैठकीला शहबाझ शरीफ यांनी संबोधित केलं. तसंच आपण नवाझ शरीफ यांची वाट पाहत असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवाय त्यांनी पाकिस्तानात परतावं आणि चौथ्यांदा पंतप्रधान बनावं असं आवाहनही त्यांनी केलंय.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पक्षाची बैठक घेण्यामागचं कारण निवडणूक आयोगाला सांगितलं. आमच्यावर निवडणूक आयोगाची टांगती तलवार आहे. पीएमएल-एनला तरुण नेतृत्वाची गरज असल्याचं त्यांनी बैठकीदरम्यान सांगितलं. याशिवाय नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम शरीफ यांचंही या बैठकीत कौतुक करण्यात आलं. नवाझ शरीफ पाकिस्तानात परतल्यानंतर राजकारणाची दिशाच बदलेल असंही शाहबाज शरीफ यांनी स्पष्ट केलं.

गुलाब नाही काटे मिळाले...
आपल्या पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शरीफ यांनी आपला पक्ष सत्तेत आला तेव्हा आपल्याला गुलाब नाही, तर काटे मिळाले होते असं म्हणत महागाईनं जनतेचं कंबरडं मोडलं होतं, असं ते म्हणाले. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ हे पीएमएल-एनचे सुप्रीमो आहेत. ते तीन वेळा पंतप्रधानही राहिले आहेत. पनामा पेपर्स प्रकरणात नवाझ शरीफ यांना २०१७ मध्ये पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं अपात्र ठरवलं होतं, त्यानंतर त्यांना कोणत्याही पक्षात जाण्यास मनाई करण्यात आली होती. 

Web Title: You want to be prime minister for the fourth time pakistan pm Shehbaz sharif call back to Nawaz Sharif economic crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.