तीन मित्रांच्या मृतदेहांसोबत दोन दिवस जंगलात राहिली तरुणी, सुटका होताच सांगितली थरकाप उडवणारी कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 06:01 PM2023-03-07T18:01:25+5:302023-03-07T18:01:57+5:30
Accident: एका तरुणीची जखमी अवस्थेत जंगलामधून सुटका कऱण्यात आली. ही तरुणी दोन दिवसांपर्यंत तिच्या तीन मित्र-मैत्रिणींच्या मृतदेहांसह जंगलात अडकली होती.
एका तरुणीची जखमी अवस्थेत जंगलामधून सुटका कऱण्यात आली. ही तरुणी दोन दिवसांपर्यंत तिच्या तीन मित्र-मैत्रिणींच्या मृतदेहांसह जंगलात अडकली होती. ही तरुणी आणि तिच्या मित्रमैत्रिणी प्रवास करत असलेल्या कारला भीषण अपघात झाला होता. मात्र त्यांच्या कारचे अवशेष पोलिसांना सापडत नव्हते. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणीची आई अपघात झालेल्या ठिकाणाजवळून तीन वेळा गेली. मात्र तिलाही तिची मुलगी दिसून आली नव्हती. २० वर्षांची सोफी रसन ही तरुणी जवळपास ४६ तासांपर्यंत आपल्या मित्रमंडळीच्या मृतदेहांसोबत जखमी अवस्थेत राहिली. तिची मान आणि मणक्याच्या हाडाला दुखापत झाली होती. ती सौम्य बेशुद्धावस्थेत होती. त्यामुळे ती तिचा फोनही वापरू शकत नव्हती.
या तरुणीची आई ऐना हिने सांगितले की, शुक्रवारी जेव्हा हे सर्व मित्र परत आले नाहीत, तेव्हा मी पोलिसांकडे मदत मागितली. मात्र पोलिसांनी काहीच उत्तर दिलं नाही. पोलिसांकडून मदत न मिळाल्याने सोफी आणि तिच्या मित्रांच्या सुमारे २०० नातेवाईकांनी त्यांवा शोधण्याची जबाबदारी घेतली. मात्र अपघात झाल्यानंतर त्यांची कार झाडांच्या मागे गेल्याने ती कुणाला दिसत नव्हती. आता सोफी आणि तिची एक ३२ वर्षीाय मैत्रीण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. तर त्यांची २१ वर्षीय मैत्रिण डार्सी रोज, ईव्ह स्मिथ आणि त्यांचा मित्र राफेल जियान यांचा या अपघातात मृत्यू झाला.
सोफीच्या आईने सांगितले की, मी घटनास्थळावरून तीन वेळा ड्राईव्ह करून गेले. सोफी तिथून २० यार्ड अंतरावर मृत मित्रांजवळ पडलेली होती. मात्र तिथे दाट झाडी असल्याने मी त्यांना पाहू शकले नाही. ती तिथे पडून मदत मिळेल की नाही याबाबत विचार करत होती. ती मदतीसाठी हाका मारत होती. वो मात्र तिचा आवाज कुणीच ऐकू शकलं नाही. ऐना यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीच्या डोक्याला दुखापत झाली आहे.