सेक्सनंतर तरुणाने महिलेला सोशल मीडियावर केलं ब्लॉक, त्यानंतर राग व्यक्त केल्याने कोर्टाने महिलेलाच ठरवले दोषी  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 01:58 PM2021-12-23T13:58:29+5:302021-12-23T14:10:44+5:30

Crime News: एका तरुणाने सेक्स केल्यानंतर त्या महिलेला सोशल मीडियावर ब्लॉक केलं. त्यामुळे सदर महिला एवढी संतापली की, तिने त्या तरुणाला जिवे मारण्याची धमकी देणे सुरू केले. तसेच त्याच्यावर बलात्कारासारखे गंभीर आरोपही केले. मात्र कोर्टामध्ये महिलेचे आरोप खोटे ठरले.

Young man blocks woman on social media after sex, court finds woman guilty after expressing anger | सेक्सनंतर तरुणाने महिलेला सोशल मीडियावर केलं ब्लॉक, त्यानंतर राग व्यक्त केल्याने कोर्टाने महिलेलाच ठरवले दोषी  

सेक्सनंतर तरुणाने महिलेला सोशल मीडियावर केलं ब्लॉक, त्यानंतर राग व्यक्त केल्याने कोर्टाने महिलेलाच ठरवले दोषी  

Next

मेलबर्न - ऑस्ट्रेलियामधून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने सेक्स केल्यानंतर त्या महिलेला सोशल मीडियावर ब्लॉक केलं. त्यामुळे सदर महिला एवढी संतापली की, तिने त्या तरुणाला जिवे मारण्याची धमकी देणे सुरू केले. तसेच त्याच्यावर बलात्कारासारखे गंभीर आरोपही केले. मात्र कोर्टामध्ये महिलेचे आरोप खोटे ठरले. त्यानंतर सदर मित्राला जिवे मारण्याची धमीक दिल्याप्रकरणी सदर महिलेला कोर्टाने दोषी ठरवले.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार ऑस्ट्रेलियातील अॅडिलेड येथे एका महिलेला तिच्या पुरुष मित्राला जिवे मारण्याची धमकी देणे, प्रताडित करणे, जखमी करण्याची धमकी देणे अशा आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आले. सदर महिलेने तिच्या पुरुष मित्रावर बलात्काराचाही आरोप केला होता. अॅडिलेड डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये झालेल्या सुनावणी वेळी सदर पुरुषाच्या वकिलांनी सांगितले की, २०१७ मध्ये सहमतीने शरीरसंबंध ठेवल्यानंतर तिला सोशल मीडियावरून ब्लॉक केले होते. त्यामुळे सदर महिला ही खूप नाराज झाली होती. तिने सदर पुरुष मित्राला धमकावण्यास सुरुवात केली. अखेरीस त्याच्यावर बलात्कार आणि डेबिट कार्ड चोरून पैसे उडवल्याचा आरोपही केला.

दरम्यान, याबाबत महिलेने दावा केला की, त्या मित्राने त्या दिवशी मद्यपान केले होते. बलात्कार करण्यासाठी त्याने मलाही नशेमध्ये बेशुद्ध केले. तसेच बेशुद्धावस्थेत सहमती कशी दिली जाऊ शकते. सदर महिलेने कोर्टामध्ये पुरावे दिले की, तिने सोशल मीडियावर कुणालाही त्रस्त केलेले नाही. तसेच ब्लॉक केल्याने रागाच्या भरात हे कृत्य केल्याचेही तिने खंडन केले.

दरम्यान, कोर्टामध्ये सदर मित्राच्या वकिलांनी दावा केला की, ब्लॉक केल्याच्या घटनेने सदर महिलेच्या मनातील राग अनावर झाला. त्यानंतर तिने या पुरुष मित्राविरोधात शोषणाचा आरोप करून खटला दाखल केला. एवढेच नाही तर महिलेने फेसबुकवर खोटी प्रोफाइल तयार करून पुरुष मित्रासह त्याच्या कुटुंबाला यातना, अंगभंग आणि जिवे मारण्याची अनेकदा धमकी दिली. एवढेच नाही तर कापलेले शीर आणि तुटलेल्या मोडलेल्या अवयवांचे फोटोही पाठवले.

दरम्यान, कोर्टाने महिलेला तिच्या पुरुष मित्राला जिवे मारण्याची धमकी देणे, प्रताडित करणे, हातपाय तोडण्याची धमकी देणे, तसेच त्याच्या कुटुंबाला त्रास दिल्या प्रकरणी दोषी ठरवले. जानेवारी महिन्यात होण्याऱ्या सुनावणीनंतर या महिलेला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. 

Web Title: Young man blocks woman on social media after sex, court finds woman guilty after expressing anger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.