शारीरिक संबंधांवेळी उत्साह नडला; भलत्याच उद्योगामुळे युवक हॉस्पिटलला पोहचला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 01:58 PM2022-01-12T13:58:29+5:302022-01-12T14:31:35+5:30
कपलनं कित्येक बॉटल दारु प्यायली परंतु त्यानंतर सेक्सदरम्यान बॉयफ्रेंड रक्तबंबाळ झाला.
लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रत्येक कपल्स उत्सुक असते. लग्नाचा वाढदिवस हटके साजरा व्हावा असं प्रत्येक नवऱ्याला आणि बायकोला वाटत असते. मात्र एक कपल्स त्यांच्या रिलेशनशिपची तिसरी एनिवर्सरी साजरा करण्याच्या नादात भलताच उद्योग करुन बसले. हे कपल्स एनिवर्सरी साजरी करण्यासाठी इतके उत्साहित होते की बॉयफ्रेंडला दबाव जाणवू लागला म्हणून त्याने ऑनलाइन वियाग्रा मागवली.
कपलनं कित्येक बॉटल दारु प्यायली परंतु त्यानंतर सेक्सदरम्यान बॉयफ्रेंड रक्तबंबाळ झाला. सेक्सवेळी बॉयफ्रेंडच्या प्रायव्हेट पार्टला फ्रॅक्चर झालं. तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्याला हॉस्पिटलला दाखल करण्याची वेळ आली. ही घटना ब्रिटनच्या लिवरपूल येथील आहे. द सनच्या रिपोर्टनुसार, २५ वर्षीय मेकअप आर्टिस्ट इजाबेल वूल्फ आणि तिचा ३२ वर्षीय बॉयफ्रेंड रॉब एन्डू यांनी तिसरी एनिवर्सरी साजरी करण्यासाठी खास तयारी केली होती. त्यासाठी या दोघांनी शहराच्या बाहेर जात एक खोली बुक केली होती. एनिवर्सरी खास बनवण्यासाठी कपलनं एडवेंजरचे अनेक सामानसोबत घेतले होते.
कपलच्या म्हणण्यानुसार, दोघांनी काही वेळेतच शॅम्पेनच्या ३ बॉटल्स खाली केल्या होत्या. त्यानंतर हे दोघं इतके नशेत गेले की त्यांना काहीच कळालं नाही. त्यामुळेच आयुष्यातील खासगी क्षण एन्जॉय करताना हा दुर्दैवी अपघात झाला. जेव्हा नशेतून बाहेर पडले. तेव्हा गर्लफ्रेंडनं तातडीने रुग्णवाहिकेला बोलावून बॉयफ्रेंडला उपचारासाठी रुग्णालयात नेले. हॉस्पिटलला जात जेव्हा डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा बॉयफ्रेंडच्या प्रायव्हेट पार्टला फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं. काही दिवसांच्या उपचारानंतर बॉयफ्रेंडची तब्येतीत सुधारणा झाली.
सेक्सदरम्यान प्रायव्हेट पार्टला फ्रॅक्चर झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. मागील वर्षी ब्रिटनमध्ये राहणाऱ्या आणखी एका व्यक्तीसोबत ही दुर्घटना घडली होती. ४० वर्षीय व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत होऊन फ्रॅक्चर करण्यात आलं होतं. ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये या घटनेचा उल्लेख करण्यात आला होता. दारुच्या नशेत कपलने अतिशय ताण घेत बळजबरीने सेक्स करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो युवकाच्या जीवावर बेतण्याची शक्यता होती. मात्र नशीब बलवत्तर म्हणून या युवकाचे प्राण वाचले.