शिक्षणासाठी "ती" करतेय आपल्या व्हर्जिनिटीचा लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2017 11:21 AM2017-05-24T11:21:47+5:302017-05-24T11:57:17+5:30
18 वर्षीय या तरुणीला आपल्या शिक्षणाचा खर्च काढायचा असल्या कारणाने तिने हा लिलाव केला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - आजपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या लिलावांबद्दल ऐकलं असेल पण आपल्या व्हर्जिनिटी म्हणजेच कौमार्याचा कोणी लिलाव केल्याचं कधी ऐकलं किंवा पाहिलं नसेल. पण एका तरुणीने आपली व्हर्जिनिटी लिलावासाठी काढल्याची एक घटना समोर आली आहे. 18 वर्षीय या तरुणीला आपल्या शिक्षणाचा खर्च काढायचा असल्या कारणाने तिने हा लिलाव केला आहे.
आपल्या व्हर्जिनिटीचा एखाद्याने लिलाव करण्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधीही रोमानियामधील एका मॉडेलने 2 मिलिअन पाऊंड म्हणजेच 17 कोटी रुपयांमध्ये आपल्या व्हर्जिनिटीचा लिलाव केला होता. या मॉडेलपासून प्रेरणा घेत जर्मनीच्या या तरुणीने आपल्या व्हर्जिनिटीचा लिलाव करण्याची तयारी दर्शवली आहे.
किम असं या तरुणीचं नाव आहे. अर्धी जर्मन आणि अर्धी ऑस्ट्रियन नागरिक असलेल्या किमने यासाठी एका एस्कॉर्ट एजन्सीसोबत संपर्क साधला आहे. या एनज्सीने आपल्या वेबसाईटवर दावा केला आहे की, व्हर्जिनिटीचा पुरावा देण्यासाठी तरुणीकडे डॉक्टरचं प्रमाणपत्र आहे. तसंच ज्याला इच्छा असेल तो व्यक्ती स्वत: तरुणीची वैद्यकीय तपासणी करु शकतो.
व्हर्जिनिटीच्या लिलावासाठी 86,640 पाऊंड (जवळपास 73 लाख रुपये) पासून सुरुवात करण्यात आली आहे. लिलावात मिळणा-या रकमेच्या 20 टक्के भाग एजन्सीला मिळणार आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, किमने वेबसाईटवर आपलं नाव लिहित, आपल्या व्हर्जिनिटी विकायची असल्याचं सांगितलं आहे.
"मला जर्मनीत किंवा ऑस्ट्रियात शिकायचं आहे. जे पैसे मिळतील त्यातून मी एक फ्लॅट खरेदी करु शकेन, शिक्षणाचा खर्च उचलू शकेन तसंच एक चांगली कारही खरेदी करेन", असं किमने सांगितलं आहे.