तुमचं वजन वाढतंय, शुगर लेव्हल हाय आहे? कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर? - त्यातही गडबड?

By Admin | Published: June 6, 2017 05:51 PM2017-06-06T17:51:15+5:302017-06-06T17:51:15+5:30

मग तुमच्या या साऱ्या कटकटींचं मूळ फक्त या एकाच गोष्टीत आहे..

Your weight is rising, is sugar level high? Cholesterol and Blood Pressure? - Anyway? | तुमचं वजन वाढतंय, शुगर लेव्हल हाय आहे? कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर? - त्यातही गडबड?

तुमचं वजन वाढतंय, शुगर लेव्हल हाय आहे? कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर? - त्यातही गडबड?

googlenewsNext

- मयूर पठाडे

तुमचं वजन का वाढतंय, तुमची शुगर लेव्हल हाय का होतेय, तुमच्या शरीरातलं कोलेस्टरोॅल का वाढतंय? ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम्स तुमची चिंता का वाढवतेय? हृदयविकाराची शक्यता तुमच्यात जास्त का आहे?..
कधी विचार केलाय या प्रश्नांचा? गेलात कधी या प्रश्नांच्या मुळाशी? बघा तपासून.. कदाचित या साऱ्या प्रश्नांचं एकच उत्तर असू शकेल, ते म्हणजे तुमच्या आहाराच्या पद्धतीत.
बघा, विचारा स्वत:ला, रात्रीचं जेवण तुम्ही उशिरा घेता का?.. तसं असेल तर तुमच्या या साऱ्या प्रश्नांचं उत्तर आणि प्रॉब्लेम एकच आहे.. लेट नाईट इटिंग!
यासंदर्भात अलीकडेच एक मोठ्ठा अभ्यास करण्यात आला. अमेरिकेतील पेनसिल्वानिया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा अभ्यास केला.

 


‘लवकर निजे, लवकर उठे, त्यास सुखसमृद्धी आरोग्य लाभे’ ही जी आपल्याकडची परंपरागत म्हण आहे, त्यात खूचप तथ्य आहे, हे शास्त्रज्ञांनी पुन्हा एकदा शोधून काढलं आहे.
त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि किमान आपलं रात्रीचं जेवण तरी वेळेवर घ्या, जेवणात आणि झोपण्याच्या वेळेत पुरेस अंतर राखा.. आरोग्याच्या तुमच्या साऱ्या कटकटी नक्कीच दूर होतील..

Web Title: Your weight is rising, is sugar level high? Cholesterol and Blood Pressure? - Anyway?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.