OMG! प्लेझरसाठी तरुणाने राजमाचे दाणे वापरले; बेकार हाल झाले, थेट हॉस्पिटल गाठले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 03:00 PM2021-08-20T15:00:30+5:302021-08-20T15:01:53+5:30
Horrible, Youth did Weird Experiment: मिशिगनच्या स्पॅरो हॉस्पिटलमध्ये या तरुणाला गंभीर अवस्थेत भरती करण्यात आले होते. तो वेदनेने विव्हळत होता.
सेक्सुअल प्लेझरसाठी एका व्यक्तीने विचित्र प्रकार (Weird Sex Experiment) केला, तो त्याला भारी पडला. त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये राजमाचे 6 दाणे (Kidney Beans in Private Part) अडकले. त्याची एवढी बेकार हालत झाली, की त्याच्यावर डॉक्टरांना ऑपरेशन करावे लागले. (Youth did Weird Sex Experiment, put Kidney Beans in Private Part)
डेली मेलने छापलेल्या एका रिपोर्टनुसार अमेरिकेच्या मिशिगनमध्ये 30 वर्षीय तरुणासोबत हा प्रकार घडला आहे. त्याला लघवी देखील करता येत नव्हती. तब्येत बिघडल्याने त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर सर्जरी करून त्याचे प्राण वाचविले.
मिशिगनच्या स्पॅरो हॉस्पिटलमध्ये या तरुणाला गंभीर अवस्थेत भरती करण्यात आले होते. तो वेदनेने विव्हळत होता. तसेच लघवीही करू शकत नव्हता. डॉक्टरांनी जेव्हा तपासले तेव्हा त्यांना या तरुणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये राजमाचे 6 दाणे अडकल्याचे आढळले. हे पाहून डॉक्टर हैराण झाले होते. परंतू तेव्हा डॉक्टरांकडे यावर विचार करण्याचा किंवा उत्तरे शोधण्याचा वेळ नव्हता. त्या तरुणाला वाचविणे गरजेचे होते. यामुळे डॉक्टरांनी त्याच्याचे तातडीने ऑपरेशन केले आणि अडकलेले दाणे बाहेर काढले. या तरुणाचा जीव वाचला.
ऑपरेशन छोटे असले तरी जोखीम मोठी होती. डॉ. मार्गो डेनिस यांनी सांगितले की, नळीमध्ये राजमाचे दाणे अडकले होते. तरुणाने ते घरी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतू त्याला जमले नव्हते. हे एक साधे ऑपरेशन होते. उपचारादिवशीच त्या तरुणाला घरी सोडण्यात आले. डॉक्टरांनी जेव्हा त्याला या प्रकाराबाबत विचारले तेव्हा या तरुणाने त्यांना मी प्रयोग करत होतो असे उत्तर दिले.