यूट्यूबची जगभरातील सेवा पूर्णपणे ठप्प; वापरकर्ते त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 07:31 AM2018-10-17T07:31:39+5:302018-10-17T08:49:51+5:30
ट्विटरवर #YouTubeDOWN ट्रेंडमध्ये
मुंबई: यूट्यूबची जगभरातील सेवा ठप्प झाली आहे. जगभरातील हजारो लोकांना यूट्यूब वापरताना अडचणी येत आहेत. यूट्यूब सुरू करताच वापरकर्त्यांना एरर मेसेज दिसत आहे. डेस्कटॉप आणि मोबाईल अशा दोन्ही ठिकाणी यूट्यूब वापरताना अडचणी येत आहेत. अनेकांनी यूट्यूबवर लॉगईन करण्याचा, व्हिडीओ अपलोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आलेलं नाही. सोशल नेटवर्किंग साईट्सवर अनेकांनी त्यांचा याबद्दलचा अनुभव शेअर केला आहे. त्यामुळे ट्विटरवर यूट्यूब डाऊन (#YouTubeDOWN) ट्रेंडमध्ये आहे.
YouTube is down worldwide. pic.twitter.com/UcDELbcKZK
— ANI (@ANI) October 17, 2018
यूट्यूबवर लॉग इन करताना वापरकर्त्यांना अडचणी येत आहेत. यूट्यूब सुरू करताच एरर मेसेज दिसत आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना व्हिडीओ अपलोड करणं, व्हिडीओ पाहणं शक्य होत नाहीय. यूट्यूब बंद असल्याच्या तक्रारींनी सोशल मीडियावर पूर आला आहे. फेसबुक, ट्विटरवर अनेकांनी यूट्यूब सुरू करताच दिसणारा एरर मेसेज शेअर केला आहे. यूट्यूबची मालकी गुगलकडे आहे. मात्र यावर अद्याप कंपनीनं कोणतीही माहिती दिलेली नाही.
YouTube faces global outage, users post screenshots of internal error 500 message. pic.twitter.com/KLAfzjFoqr
— ANI (@ANI) October 17, 2018