जगभरात यूट्यूबची सेवा पूर्ववत; वापरकर्त्यांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 09:00 AM2018-10-17T09:00:51+5:302018-10-17T09:01:30+5:30
सकाळी साडेसहापासून यूट्यूबची सेवा ठप्प झाली होती
नवी दिल्ली: जवळपास दोन तासांच्या खोळंब्यानंतर अखेर यूट्यूबची सेवा सुरू झाली आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी साडे सहाच्या सुमारास यूट्यूबची सेवा ठप्प झाली. त्यामुळे जगभरातील वापरकर्त्यांचा खोळंबा झाला. यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर याबद्दलचे स्क्रिनशॉर्ट्स शेअर केले. अखेर यूट्यूबनं याची दखल घेतली. यानंतर सव्वा आठच्या सुमारास यूट्यूबची सेवा पुन्हा सुरू झाली.
सकाळी साडे सहाला यूट्यूबची जगभरातील सेवा ठप्प झाली. त्यामुळे लाखो लोकांना यूट्यूब वापरताना अडचणी येत होत्या. यूट्यूब सुरू करताच वापरकर्त्यांना एरर मेसेज दिसत होता. डेस्कटॉप आणि मोबाईल अशा दोन्ही ठिकाणी यूट्यूब वापरताना अडचणी येत होत्या. अनेकांनी यूट्यूबवर लॉगईन करण्याचा, व्हिडीओ अपलोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. सोशल नेटवर्किंग साईट्सवर अनेकांनी त्यांचा याबद्दलचा अनुभव शेअर केला. त्यामुळे ट्विटरवर यूट्यूब डाऊन (#YouTubeDOWN) ट्रेंडमध्ये होता.
Thanks for your reports about YouTube, YouTube TV and YouTube Music access issues. We're working on resolving this and will let you know once fixed. We apologize for any inconvenience this may cause and will keep you updated.
— Team YouTube (@TeamYouTube) October 17, 2018
यूट्यूब सुरू करताच दिसणाऱ्या एरर मेसेजचे स्क्रिनशॉट अनेकांनी ट्विटर आणि फेसबुकवर शेअर केले. यानंतर तांत्रिक कारणामुळे सेवेवर परिणाम झाल्याची माहिती यूट्यूबनं दिली. सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न आमच्याकडून सुरू असल्याचं यूट्यूबनं ट्विटमध्ये म्हटलं होतं. यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये यूट्यूबची सेवा पुन्हा सुरू झाली.