हायब्रीड तांदळाचे जनक युआन लाेंगपिंग कालवश, चीनमधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 06:08 AM2021-05-26T06:08:53+5:302021-05-26T06:10:14+5:30
Yuan Langping: हायब्रीड तांदळाचे जनक म्हणून ओळखले जाणारे चीनचे प्रसिद्ध कृषी संशाेधक युआन लाेंगपिंग यांचे निधन झाले. ते ९० वर्षांचे हाेते. चांगशा येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
नवी दिल्ली : हायब्रीड तांदळाचे जनक म्हणून ओळखले जाणारे चीनचे प्रसिद्ध कृषी संशाेधक युआन लाेंगपिंग यांचे निधन झाले. ते ९० वर्षांचे हाेते. चांगशा येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
युआन यांनी केलेल्या संशाेधनामुळे चीन, आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये दुष्काळावर मात करण्यासाठी फार माेठी मदत झाली हाेती. तांदळाच्या हायब्रीड प्रजातीवर त्यांनी नऊ वर्षे संशाेधन केले. अनेक प्रकारच्या हायब्रीड तांदळाच्या जाती त्यांनी विकसित केल्या.
अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या युआन यांनी १९५९-१९६१ या कालावधीत चीनमधील सर्वात भीषण दुष्काळ अनुभवला हाेता.
त्यात सुमारे ४५ दशलक्ष नागरिकांचा भुकेने मृत्यू झाला हाेता. त्यातूनच त्यांनी अन्नधान्याच्या उत्पादनासाठी काम करण्याची प्रेरणा घेतली हाेती. त्यांच्या संशाेधनाचा जागतिक पातळीवर प्रभाव पडला हाेता.